Lightning struck Lightning struck
मुंबई

मोबाइल नेटवर्कसाठी मुलं झाडावर चढली, अंगावर कोसळली वीज

दुर्देवाने त्याचवेळी घात झाला

दीनानाथ परब

पालघर: दरवर्षी पावसाळ्यात (rainy season) वीज अंगावर (Lightning) कोसळण्याच्या घटना घडत असतात. वीज अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील पालघर (palghar) जिल्ह्यात वीज अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा (boys) मृत्यू झाला, तर तीन मुलं जखमी झाली आहेत. (Lightning kills boy injures three after they climb tree for mobile network in Palghar)

मोबाइलचं नेटवर्क मिळवण्यासाठी मुलं झाडावर चढली होती. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. सोमवारी संध्याकाळी डहाणू तालुक्यातील मानकरपाडा येथे चार मुलं गुरांना चरण्यासाठी घेऊन गेली होती. त्यावेळी ही घटना घडली, अशी माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

सोमवारी पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. ढगांच्या गडगडाटासह वीजा चमकत होत्या. वातावरण खूपच खराब होते. त्यावेळी चार मुलं हातात असलेल्या मोबाइल फोनचं नेटवर्क मिळवण्यासाठी झाडावर चढली. दुर्देवाने त्याचवेळी घात झाला. चौघांच्या अंगावर वीज पडली. रविंद्र कोरदा (१५) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन मुलं १४ ते १६ वयोगटातील आहेत. ही मुलं जखमी झाली आहेत. कासा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT