मुंबई

रेड झोन मुंबईतील दारूची दुकानं सुरु राहणार की होणार बंद? मुंबईकरांनो आधी वाचा नंतर महत्त्वाची बातमी..

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील वाईन शॉप पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी आज परीपत्रक प्रसिध्द करुन फक्त किराणामाल आणि औषधाची दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महसुलाचा मार्ग म्हणून राज्य सरकाने दोन दिवसांपुर्वी वाईन शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर नागरी वस्तीतीतील अत्यावश्यक सेवेतील 5 दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मुंबईत सोमवार पासून वाईन शॉप सुरुही झाले. मात्र,प्रचंड गर्दी होऊन सामाजिक अंतराचा नियमच पायदळी तुडवला गेला. त्यामुळे पोलिसांवरही अतिरीक्त ताण येऊ लागला.

महापालिका आयुक्तानी मंगळवार दिनांक ५ मे रोजी संध्याकाळी फेर आढावा घेऊन फक्त अत्यावश्क सेवेतील दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याच बरोबर या नियमांचे पोलिसांच्या सहकार्याने काटेकोर पालन करण्याचे निर्देश ही सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

मुंबई हे रेड झोनमध्ये आहे. त्याच बरोबर कोरोना रुग्णांची संख्याा कमी होत नाही. अशा परीस्थीतीत सामाजिक अंतर व ताळेबंदी काटेकोर पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे आयुक्तांनी या परीपत्रकात म्हटले आहे. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची परवानगी आयुक्तांनी दिल्यामुळे आता वाईन शॉप्सही बंद होणार आहेत. 

liquor shops in mumbai might be shut due to over crowd and not following physical distance

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT