मुंबई

Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या; आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: मध्य रेल्वेने कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर उभारण्यासाठी शनिवारी व रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. पहिला ब्लॉक सहा तासांचा तर दुसरा ब्लॉक तीन तासांचा असणार आहे.

त्यामुळे सीएसएमटीहून रात्री ११.४२ची टिटवाळा ही शेवटची लोकल आणि हार्बर मार्गावरील रात्री ११.३०ची सीएसएमटीहून पनवेलला जाणारी शेवटची लोकल असणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर, पनवेल रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर उभारण्यासाठी शनिवारी-रविवारी रात्री सहा तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक शनिवार मध्यरात्री बारापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत असणार आहे.

तर, दुसरा ब्लॉक रविवारी मध्य रात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत असणार आहे. या दोन्ही ब्लॉक कालावधीत भायखळा आणि सीएसएमटी तसेच हार्बर लाइनवर वडाळा रोड आणि सीएसएमटीदरम्यान उपनगरीय लोकल सेवा रद्द असणार आहे.

मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत/ पासून शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट केल्या केल्या जातील. दरम्यान, अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्या दादर स्थानकातून मार्गस्थ केल्या जाणार आहेत.

..

रविवारी दिवसा प्रवाशांना दिलासा

कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर उभारण्याच्या कामासाठी शनिवारी-रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतल्याने मध्य रेल्वेने रविवारी घेण्यात येणारा नियमित मेगाब्लॉक रद्द केला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेनेही रविवारचा ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी दिवसा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Dasara Melava: "अदानींच्या कामांचे जीआर निघत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही"; आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

Dussehra Melava 2024 Live Updates: सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल आपण काढणार - आदित्य ठाकरे

IND vs BAN: हर्षित राणाला का दिली नाही पदार्पणाची संधी? टॉसनंतर लगेचच BCCI ने सांगितलं खरं कारण

Raj Thackeray On RSS : "एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही...", राज ठाकरेंकडून 'आरएसएस'चं तोंडभरून कौतुक

Latest Maharashtra News Updates : देवीच्या दर्शनाला निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT