MLA hitendra thakur  esakal
मुंबई

Loksabha Election 2024 : शिट्टी` निवडणूक चिन्ह मिळवण्यात बविआला यश

आमदार हितेंद्र ठाकूर यांची शिवसेना-भाजपविरोधातील दुसरी रणनीतीही यशस्वी.

संदीप पंडित

विरार - जनमानसांत आणि कार्यकर्त्यांत लोकप्रिय असलेले ‘शिट्टी` हे चिन्ह पुन्हा प्राप्त करण्यात बहुजन विकास आघाडीने यश प्राप्त केले आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना-भाजप पक्षाने 2018च्या लोकसभा पोट निवडणुकीत ‘शिट्टी` हे चिन्ह गोठवण्यासाठी प्रयत्न केले होते.

परिणामी बहुजन विकास आघाडीला ही निवडणूक ‘रिक्षा` या चिन्हावर लढवावी लागली होती. त्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीत हे चिन्ह बहुजन विकास आघाडीला मिळू नये, याकरता या दोन्ही पक्षांनी आटोकाट प्रयत्न चालवले होते, मात्र यावर मात करत बहुजन विकास आघाडीने हे चिन्ह मिळविल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

मागील कित्येक वर्षे बहुजन विकास आघाडी ‘शिट्टी` या चिन्हावर निवडणूक लढवत आलेली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिट्टी हे चिन्ह बहुजन विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह म्हणून प्रसिद्ध होते. प्रचार मोहिमा आणि निवडणूक जाहिरातींतील कल्पकतेतूनही बहुजन विकास आघाडीने या चिन्हाला लौकिक प्राप्त करून दिलेला होता.

त्यामुळे शिट्टी व बहुजन विकास आघाडी हे समीकरण बनलेले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या चिंतामण वनगा यांच्या अकाळीनिहनाने 2018 च्या लोकसभा पोट निवडणुकीत हे चिन्ह नोंदणीकृत नाही, असा आक्षेप शिवसेना-भाजपने घेतल्याने निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले होते.

दरम्यान; 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप असाच आक्षेप घेतला जाईल, याची कल्पना असलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या चिन्हासाठी आधीच रणनीती आखली होती. त्यासाठी त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राजेश पाटील यांचा 26 एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी औपचारिकरीत्या उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या वेळी त्यांनी ‘शिट्टी` या चिन्हासाठीही दावा केला होता. शिवाय बॅकअप प्लान म्हणून शिट्टीसोबत एन्व्हलप, रिक्षा या चिन्हांचीही मागणी केली होती.

यावेळीही बविआचे उमेदवार राजेश पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या रायगडमधील व्यक्तीच्या नावाने नामांकन अर्ज दाखल करून शिवसेना-भाजपने बहुजन विकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निवडणूक आयोगाच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत बहुजन विकास आघाडीने ‘शिट्टी` हे चिन्ह पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे; त्याआधी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे नाव भाजप-शिवसेनेच्या उमेदवार निवड यादीतून उडवण्याकरता बहुजन विकास आघाडीने वापरलेली ‘प्रेशर टॅक्टिस` यशस्वी झाली आहे. भाजप-शिवसेनेची उमेदवारी घोषणा लांबलेली असताना व विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राजेश पाटील यांचे नाव जाहीर करून भाजप-शिवसेनेला ‘चेकमेट` दिला होता.

याचे परिणाम म्हणून खासदार राजेंद्र गावित यांच्या ऐवजी डॉ. हेमंत सावरा यांचे नाव महायुतीला घोषित करावे लागले आहे. प्रत्यक्षात वसई, नालासोपारा व बोईसर या बविआची ताकद असलेल्या मतदारसंघांत डॉ. हेमंत सावरा यांचा लोकसंपर्क नाही. त्यामुळे अनपेक्षित जाहीर झालेली डॉ. हेमंत सावरा यांची उमेदवारी व आता मिळालेले ‘शिट्टी` हे निवडणूक चिन्ह बविआचा विजयाचा मार्ग सुकर करते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT