narendra modi and arvind kejriwal sakal
मुंबई

Mumbai Loksabha Election : मुंबईच्या मैदानात मोदी व केजरीवाल

शेवटच्या टप्प्यासाठी महायुती व ‘मविआ’च्या सभांचा धुरळा

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा राज्यातील अखेरच्या पाचव्या टप्प्यात मुंबई केंद्रस्थानी असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या सांगता सभेचा धुरळा शुक्रवारी (ता.१७) उडणार आहे. महायुतीच्या मनसेने आयोजित केलेल्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत तर महाविकास आघाडीच्या सांगता सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थिती राहणार असल्याने या दोन्ही सभा २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी निर्णायक ठरणार आहेत.

याविषयी माहिती देताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘केजरीवाल यांना जामीन देताना न्यायालयाने ‘ईडी’ला फटकारले. राजकीय सूडबुद्धीतून त्यांना अटक केली होती. जामीन मिळाल्याने ते आता प्रचारात सहभागी होऊ शकतील. त्यांना जामीन मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री केजरीवाल यांचे स्वागत व अभिनंदन केले.

मी देखील त्यांच्याशी बोललो आहे. मुंबईतील लोकसभा निवडणुकीनिमित्त येत्या १७ रोजी महाविकास आघाडीची सांगता सभा होणार आहे. त्या सभेला अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केले आहे. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.’'

राज ठाकरेंच्या भूमिकेने यातना : राऊत

‘राज ठाकरेंसारखे काही नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यांच्या या वागणुकीचा प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना न केलेली बरी. अमित शाह, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्‍गृहस्थ आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात याबद्दल ‘ईडी’चे आभार,’ असे राऊत म्हणाले.

‘ते’ दखल घेण्यासारखे नाहीत

पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधरल मोहोळ यांच्या प्रचारसाठी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी अजित पवार यांनी कधीही जातीयवाद केला नाही, असे सांगत शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच मोहोळ यांना मतदान करण्यासाठी हिंदू धर्मियांना फतवा काढत असल्याचे सांगत मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी सभेत केले होते त्यांच्या या आवाहनावर टीका करीत ते फार दखल घेण्यासारखे नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT