मुंबईच्या झोपडपट्टी भागात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यात येत आहे.  esakal
मुंबई

Campaigning in Slum Area : झोपडपट्ट्यांमध्ये प्रचारावर भर

Dharavi Slum Area : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न सुरू

सकाळ डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक मतदान होते. हे लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा भर झोपडपट्ट्यांवर दिला आहे. तेथील समस्या जैसे थे असल्याने उमेदवारांना स्थानिकांच्या या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईतील सहा मतदारसंघात लहान-मोठ्या झोपडपट्ट्या आहे. त्या त्या मतदारसंघांत या झोपडपट्ट्यांमधून होणारे मतदान निकालावर प्रभाव टाकणारे ठरत असते. मुंबईत या झोडपडपट्ट्यांची पॉकेट्स आपल्या ताब्यात राहाव्यात, यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

दक्षिण मध्य मुंबईतील धारावी हे सर्वात मोठे मतांचे पॉकेट आहे. धारावी जगात ओळखली जाते. धारावीतील एकूण लोकसंख्या सुमारे दहा लाख आहे, त्यामुळे या विभागाकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई आणि महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी प्रचारावर भर दिला आहे. या मतदारसंघातील निकालावर धारावीतील मतदान मोठा परिणाम करणारे ठरणार आहे.

मानखुर्द, घाटकोपर, सायन-कोळीवाडा, वरळी-बीडीडी चाळी, मालवणी, दहिसर गणपत पाटील नगर, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, विक्रोळी, ॲन्टॉप हिल, गोवंडी, बोरिवली, कांदिवली, मालाड, वरळी, शिवाजी नगर या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्यांचा निकाल यावेळी परिणामकारक ठरणार आहे. या भागात आता निवडणुकीचे वातावरण दिसू लागले आहे. सध्या सर्व पक्षांच्या उमेदवारांकडून या भागात प्रचाराचा जोर वाढवण्यात आला आहे.

मतांची टक्केवारी वाढणार का?

झोपडपट्ट्यांवर अधिकाधिक प्रचाराचा राजकीय पक्षांचा भर असून येथे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाचा आहे. झोपडपट्ट्यांतून मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे.

गाठीभेटी आणि बैठकांचे सत्र सुरू

सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू झाला असून येथील स्थानिक मंडळे, स्थानिक संस्था, तरुणांचे गट, ज्येष्ठ नागरिक गट, विविध समाज घटक यांच्या गाठीभेटी राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्ते यांनी सुरू केल्या आहेत. त्यांच्या बैठकांना आता वेग आला आहे. त्यांच्या मागण्याही राजकीय पक्ष पूर्ण करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT