मुंबई

Loksabha Politics: निलेश सांबरे भिवंडी लोकसभा लढविणार!

पाच लाख मताधिक्य मिळवून जिंकण्याचा निर्धार.

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी लोकसभा निवडणूक लढवून पाच लाख मताधिक्य मिळवून राजकारणातील दुकानदारी बंद करणार व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही आणणार, असा निर्धार निलेश सांबरे यांनी व्यक्त केला.

   जिजाऊ संघटना महाराष्ट्रच्या वतीने शनिवारी (ता. 27) शहापूर तालुक्यातील वासिंद येथे 'भव्य निर्धार मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी मुंबई लगतच्या कोकणातील पाचही जिल्ह्यातील दुरावस्थेची विदारक स्थिती मांडून प्रस्थापित राजकारण्यांवर टीका केली. रोजगार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रेल्वे, वीज, पाणी या सर्व क्षेत्रात प्रस्थापित राजकारण्यांनी पोकळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली व स्वतःचे खिसे भरले.

मात्र जिजाऊ संघटनेने आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा आलेख त्यांनी मांडला. राजकीय पक्षांची ध्येय धोरणे चांगली असतात मात्र काही अपप्रवृत्तीचे लोक आपल्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून घेतात, असे सांगून कोणत्याही पक्षाने उमेदवारी न दिल्यास परिस्थिती बदलण्यासाठी जिजाऊ संघटनेतर्फे भिवंडी लोकसभा निवडणूक लढवून पाच लाख मताधिक्य मिळवून शिवराज्य, रामराज्य निर्माण करण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी नागरी विमान वाहतूक आणि रेल्वे मंत्रालय बोर्डचे, सल्लागार सदस्य धनवंत तिवारी, स्वामी अलोकनाथ महाराज, फरीदूद्दीन अली मोहम्मद अश्रफी, विनयबोधी महाथेरो (भंते), पत्रकार कैलास म्हापदी आदी कैलास म्हापदी, आदी उपस्थित मान्यवरांनी सांबरे यांच्या विधायक कार्याची प्रशंसा करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सांबरे यांच्या मातोश्री भावनादेवी सांबरे, वडील भगवान सांबरे, भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे, जिजाऊ कामगार संघटना अध्यक्ष महेंद्र ठाकरे, सुजय जाधव, संजना शेलार, शिवानी गोरले, दत्तात्रय ठाकरे, राजेंद्र म्हसकर, नागनाथ लाड, जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मान्यवर व लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. मेळाव्यासाठी जिजाऊ संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन चोख व्यवस्था केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT