Wari 
मुंबई

पायी वारी होणार म्हणजे होणारच!; ठाकरे सरकारला आव्हान

पायी वारी होणार म्हणजे होणारच!; ठाकरे सरकारला आव्हान "सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं"

विराज भागवत

"सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं"

मुंबई: कोरोना परिस्थितीचा (Coronavirus) आढावा घेण्यासाठी ११ जूनला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर विठ्ठलदर्शन (Lord Vitthal) आणि वारीबद्दल (Vari) झालेल्या निर्णयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली. देहू आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली. तसेच 10 मानाच्या पालख्यांसाठी (Palkhi) 50 जणांना सहभागी होता येईल असं सांगण्यात आलं. तसेच, पालखीसोबत पायी वारी न करता प्रत्येक पालखीला 2 बसेस असं दहा पालख्यांना 20 बसेस (ST Buses) दिल्या जातील, असंही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं. पायी वारीची परंपरा (Tradition) खंडित करू नये, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात असूनही राज्य सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सध्या संघर्ष पेटताना दिसत आहे. (Lord Vitthal Devotees Ashadhi Ekadashi Walking Vari Palkhi Sohla BJP slams CM Uddhav Thackeray)

वारकरी संप्रदायाची फक्त ५० लोकांसह पायी वारीची मागणी मान्य न केल्याने भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आक्रमक झाले. "मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली. पण सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं. म्हणून आता आम्ही हे जाहीर करतो की, यापुढे होणाऱ्या सर्व परिणामांना फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे आणि अजित पवार जबाबदार असतील. आता पायी वारी होणार म्हणजे होणारच. 'सविनय कायदेभंग' काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल", असा इशारा आचार्य तुषार भोसले यांनी दिला.

राज्य सरकारने पायी वारी सोहळ्यासाठी घातलेले निर्बंध-

पालखी यंदा बसमधूनच पंढरपूरकडे जाणार. लवकरच शासन त्याबद्दल सविस्तर आदेश काढणार आहे. इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी बंधनकारक असेल. काला आणि रिंगण सोहळ्याला परवानगी देण्यात आली असली तरी त्यावरही निर्बंध आहेत. रथोत्सवलाही परवानगी आहे पण त्यासाठी १५ वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना तर प्रस्थान सोहळ्याला 100 वारकऱ्यांनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT