मुंबई

ठाणे जिल्ह्यातील 38 हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान

राहुल क्षीरसागर

मुंबईः  ठाणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात भात पिकला फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 71 हजार 709 शेतकऱ्यांच्या 37 हजार 793 हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. या सर्व क्षेत्रावरील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, आणि अंबरनाथ या सहा तालुक्यात 55 हजार हेक्टरवर भातशेतीचे पिक घेण्यात येत असते. त्यात जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक उध्वस्त झाले आहे. 

भाताचा पेंढा आणि उभे पिक पावसाने झोडपल्याने जमीनीदोस्त झाले आहे. आधीच कोरोना महामारीत हवालदिल झालेला शेतकरी आता अस्मानी संकटात सापडला आहे. शेतकरी दुबार संकटाच्या कात्रीत अडकल्याचे चित्र समोर आले आहे. 

ठाणे जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील भात शेतीला बसला आहे. भाताचे पीक कापणीसाठी योग्य झाले होते. मात्र, झालेल्या पावसामुळे हे पिक कुजून खराब झाल्याने वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरुन शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका फळपिके व्यतिरिक्त सहा तालुक्यात 71 हजार 709 शेतकऱ्यांच्या 37 हजार 793 हेक्टरवरील भात पिकाचे 33 टक्क्यांच्यावर नुकसान झाले. यामध्ये मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक 13 हजार 902 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. तर, त्या खालोखाल शहापूर तालुक्यातील 12 हजार 119 हेक्टर तर, भिवंडी तालुक्यातील 5 हजार 758 हेक्त्र्वरील भात शेतीचे नुकसान झाले आहे. यासर्व बाधित क्षेत्रावरील पिकांची पाहणी करून नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच करण्यात आलेल्या पंचनाम्यांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

नुकसान झालेले क्षेत्र आणि शेतकरी संख्या

तालुका         शेतकरी संख्या         बाधित क्षेत्र (हेक्टर)
ठाणे               996                     230.00
कल्याण         4643            3195.64
अंबरनाथ         5680             2587.51
मुरबाड         25515             13902.82
शहापूर         22716             12119.77
भिवंडी         12159             5758.05

एकूण         71709             37739.79

Loss of paddy cultivation on 38 thousand Hectors in Thane district

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

Pune Crime: पुण्यातील 'त्या' 5 मुलींनी घेतला मोकळा श्वास, पोलिसांची मोठी कारवाई

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT