File Photo 
मुंबई

म्हाडाच्या कोकण मंडळाची 9 हजार घरांची लाॅटरी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची सुमारे नऊ हजार 200 घरांच्या सोडतीची जाहिरात मंगळवारी (ता. 28) प्रसिद्ध होणार आहे. फेब्रुवारीअखेरच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या घरांसाठी सोडत काढण्याचा विचार अधिकारी करत आहेत. या सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात येत असलेल्या बहुतांश घरांचा समावेश असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर मिळणार आहे.

या सोडतीमध्ये कोकण मंडळाच्या हद्दीतील भंडार्ली, माणकोली- भिवंडी, घणसोली, वसई, शिरढोण, खोणी आदी भागांतील घरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या 20 टक्के कोट्यातील घरांचाही या सोडतीमध्ये समावेश असेल. तसेच काही विखुरलेली घरेही यात समाविष्ट आहेत. त्यामुळे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. या घरांच्या सोडतीची जाहिरात 28 जानेवारीला काढण्यात येणार आहे.

अर्ज करण्यास एक महिन्याची मुदत

अर्जदारांना अर्ज करण्यास सुमारे एक महिन्याची मुदत देण्यात येईल. त्यानंतर सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्याचे नियोजन सुरू आहे. यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीची जाहिरात काढण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 28 जानेवारी रोजी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात सोडत काढण्यात येईल. 
- माधव कुसेकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी, कोकण मंडळ 

उपलब्ध घरे 
- शिरढोण -                पाच हजार 
- खोणी-भंडार्ली-          एक हजार 136 
- माणकोली (भिवंडी) - 269 
- घणसोली -               40
- वसई -                     15

Lottery of 9,000 houses of Konkan Board of Mhada

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT