CIDCO home 
मुंबई

CIDCO Lottery: नवी मुंबईत सिडकोच्या 26 हजार घरांची 'या' तारखेला निघणार लॉटरी; बोर्ड मिटींगमध्ये ठरला मुहूर्त

कार्तिक पुजारी

CIDCO Lottery 2024: नवी मुंबईत अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या घरांची ७ ऑक्टेबरला लॉटरी निघणार आहे. सिडकोच्या बोर्ड मिटींगमध्ये याबाबतचा मुहुर्त ठरला आहे. सिडकोकडून २६ हजार घरांची लॉटरी निघणार आहे. मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस असणार आहे.

संजय शिरसाट यांनी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. सिडकोच्या घरांवरील लिज होल्ड करा, आमच्या हक्काची घर कधी होणार असा प्रश्न होता. घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णय आजच्या बोर्ड मिटींग मध्ये घेतला आहे.⁠ घर विकताना जे पैसे लागायचे ते ही फ्री केलेले आहेत. ⁠१०० मीटरच्या वरती जी घर असतील त्यांच्या कडून नाममात्र शुल्क भरावा लागेल, असं ते म्हणाले.

सर्वसामान्य जनतेच्या हक्काचं घर होणार आहे.⁠ पुढील मंत्रीमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय होईल. ⁠यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली. सव्वालाख लोकांना याचा फायदा होईल.⁠ सिडको महामंडळ वसुली वरती काही परिणाम होईल.⁠ मात्र महसुलसाठी इतर पर्याय निवडले जातील, असं ते म्हणाले.

दोन कोटी लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. यामुळे ⁠बांधकाम परवानगी मिळेल.⁠ घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगीची गरज नाही. निवडणुकीसाठी आम्ही निर्णय घेत नाही, लोकांच्या फायद्यासाठी आम्ही निर्णय घेतो. ⁠नवी मुंबई , संभाजी नगर, नाशिक आणि नागपुरला याचा फायदा होणार आहे, असं शिरसाट म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू; काँग्रेस,‘आप’सह विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

Pune : कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज यांच्याविरोधात आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Viral Video: कारची काच खाली करायला सांगितलं.. लाथा घातल्या; ऑटोरिक्षा चालकाच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Laxman Hake : हाके यांच्यावरील गैरप्रकाराचा निषेध दोषींवर कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT