मुंबई : महाड तालुक्यातील (mahad) तळीये गावात (taliye village) दरड कोसळून (land slide) जखमी झालेल्यांवर सध्या मुंबईतील (Mumbai) जेजे रुग्णालयात (JJ hospital) उपचार सुरु आहेत. मात्र, या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स (doctors) त्यांच्या शरीराला झालेल्या जखमांमधून होणाऱ्या इन्फेक्शनला (patient infection) नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जेजे रुग्णालयात एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत तिघांना सर्वाधिक इन्फेक्शन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तळीये दुर्घटनेतील एकूण 18 जखमींना जेजे रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील 7 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सध्या उपचार घेत असलेल्या 9 जणांना शरीराच्या अनेक भागांना झालेल्या जखमांमधून इंन्फेक्शन पसरले आहे. तर, त्यांचे इन्फेक्शन नियंत्रणात यावे यासाठी जेजे रुग्णालयाची टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे. तळीयेच्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत जखमी झालेले रुग्ण अनेक तास मातीच्या ढिगार्याखाली होते. अनेक जखमा झाल्यामुळे त्यात पू जमा होऊन तो भाग काळा पडत आहे.
गंभीर जखमा आणि सर्वाधिक इन्फेक्शन झालेल्या आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून सध्या 1 महिला सीसीयू मध्ये उपचार घेत असून 9 जणांवर जनरल वॉर्ड मध्ये उपचार सुरू आहेत. तर या रुग्णांची जबाबदारी जेजे रुग्णालयाने घेतली असून सर्वांचे उपचार मोफत होत असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी दिली.
तळीयेच्या दुर्घटनेनंतर जेजे रुग्णालयात दाखल झालेल्या 18 रुग्णावर तातडीने उपचार सुरू झाले. मात्र त्यातील संगीता कोंडाळकर (38) आणि स्वप्नील शिरावले (25) यांच्या खोल जखमा आणि तुटलेल्या हाडांमध्ये जास्त प्रमाणात माती जमा झाल्याने स्वप्नीलचे गुडघ्याच्या खाली पाय कापावे लागले तर संगीता यांना ओपन कंपाऊंड फ्रॅक्चर होते. यात हाडे आणि मासाचा अक्षरशः चुरा झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर प्लेटिंग आणि नेलिंगच्या शस्त्रक्रिया करून देखील त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नसल्याचे डॉ. माणकेश्वर सांगतात.
चिखलामुळे इन्फेक्शन होणे स्वाभाविक होते. या रुग्णांना मल्टिपल इन्फेक्शन होतात. 10 ते 15 दिवस झाल्यावर इन्फेक्शन सुरू होते. त्यांच्या पसचे नमुने तपासणीसाठी पाठवतो, टिशू काढतो. त्यानंतर कोणते मायक्रो ऑरगॅनिझम इन्फेक्ट म्हणजेच कोणत्या प्रकारच्या विषाणूमुळे संसर्ग झाला झाला हे समजते. त्यापूर्वी रुग्णाची प्रकृती स्थिर असल्यासारखी वाटते. मात्र ज्यावेळी हा संसर्ग झाला हे तपासणीत समोर येते तो पर्यंत संसर्गही वाढलेला असतो. त्यामुळे, अशा रुग्णांची काळजी घेणे गरजेचे असते. चिखलामुळे अनेक विषाणु शरीरात प्रवेश करतात. यातुन इंफेक्शन वाढते ते नियंत्रणात आणणे सध्या अवघड होत असल्याचे जेजे रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरूण राठोड यांनी सांगितले. तर, सध्या गंभीर पण नियंत्रणात असलेल्या स्वाती कोंडनकर या 21 वर्षीय मुलीवर सीसीयू मध्ये उपचार केले जात आहेत. तिला अँटिबायोटिक्स दिले जात असून ड्रेसिंग आणि 24 तास काळजी घेतली जाते असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.