Latest Mumbai news: म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर केलेल्या २०३० घरांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लाॅटरीची सोडत उद्या (ता. ८) निघणार आहे. नरिमन पाॅइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत ही लाॅटरी काढली जाणार आहे. लाॅटरीची सोडत अर्जदारांना घरबसल्या पाहता यावी म्हणून म्हाडाकडून वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून म्हाडाने मुंबई शहरात आणि उपनगरात असलेल्या २०३० घरांची लाॅटरी ऑगस्टमध्ये काढली होती. त्याला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल एक लाख १३ हजार ८११ जणांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरले आहेत.
त्याची मंगळवारी सोडत होणार आहे. या सोडत कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे, तसेच सभागृहाच्या आवारात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.
...
थेट प्रक्षेपणाची सुविधा
- अर्जदारांना वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या यूट्युब चॅनल व फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर व समाजमाध्यम व्यासपीठांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविले जाणार आहे.
- या लाॅटरीमध्ये नव्याने बांधकाम चालू असलेल्या पहिल्या गटामध्ये १,३२७ सदनिकांचा समावेश आहे. दुसऱ्या गटामध्ये विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), (७), ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांचा समावेश आहे, तसेच तिसऱ्या गटांतर्गत मागील सोडतीतील विविध वसाहतींतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.