Mahadev App Scam Investigation Reveals New Details fraud crime marathi news  Sakal
मुंबई

Mahadev App Scam : महादेव अॅप घोटाळा: तपासात नवनवीन माहिती उघड

महादेव अॅप घोटाळा व्यवहार करण्यासाठी देशभरात तब्बल 1600 नवीन बँक खाती तयार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महादेव अॅप घोटाळा व्यवहार करण्यासाठी देशभरात तब्बल 1600 नवीन बँक खाती तयार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या बँक खात्यातून ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून तब्बल 5000 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कंपनीचा संचालक आणि या प्रकरणात मुख्य आरोपी मृगांक मिश्रा याला अलीकडेच मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती.

बनावट बँक खात्यातून व्यवहार

माहितीनुसार, महादेव ॲपसाठी देशातून मिळणारा पैसा गोळा करण्यासाठी बँक खाती उघडण्यात आली होती. मात्र, सदर बँक खाती बनावट कागदपत्रे किंवा इतर पद्धतीने उघडण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. अनेक गरीब नागरिकांच्या सरकारी कागदपत्रांचा वापर करत त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या नावे ही खाती उघडण्यात आल्याची तपासात माहिती मिळाली आहे.

परंतु खाती गरीबांच्या नावावर असली तरी बँक खात्याचे व्यवहार मात्र ॲपचा मालक मृगांक मिश्रा सर्व व्यवहार हाताळत होता.या खात्याच्या माध्यमातून जमा झालेले पैसे रोखीने काढून त्याचा हवाला मार्फत हस्तांतरण करण्यात आल्याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांना भारतातून पैसे हस्तांतरित करण्यात मिश्रा याची भूमिका महत्त्वाची होती.

कोण आहे मृगांक मिश्रा

महादेव बेटिग ॲप घोटाळ्या प्रकरणी अ‍ॅपचा संचालक मृगांक मिश्राला मुंबई विमानतळावरून सोमवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी संचालक मृगांक मिश्रा दुबईतून अ‍ॅपचे कामकाज चालवत होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते. त्याआधारवर दुबईहून मुंबई विमानतळावर आल्यावर आरोपीला पकडण्यात आले.

आरोपी मिश्रावर 90 बनावट बँक खाते बनवल्याचा आरोप आहे. आरोपी मृगांक मिश्रा हा महादेव अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. मिश्रा मूळचा मध्य प्रदशातील रतलामचा रहिवासी असून घोटाळा उघडकीस आल्यावर गेल्या काही दिवसांपासून तो दुबईमध्ये लपला होता. तेथून तो इतर आरोपींच्या मदतीने महादेव बुक बेटिंग अ‍ॅप चालवत होता.

ईडीची कारवाई

अलीकडेच ईडीने महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील 39 ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सुमारे 417 कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आली होती.

याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर यांच्यासह 12 हून अधिक तारांकित कलाकार, खेळांडू या अॅपच्या समाजमाध्यांवर जाहिरात केली आहे. त्याप्रकरणी रणबीर कपूर, हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर यांना ईडीने समन्स पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT