मुंबई: मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लुक आऊट नोटीस (lookout notice) जारी केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. पण हे वृत्त चुकीचे आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात कुठलीही लूक आऊट नोटीस जारी केलेली नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे. (Maharashtra ACB has issued a lookout notice against former Mumbai CP Parambir Singh The news is false dmp82)
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. काही महिन्यांपूर्वी या लेटर बॉम्बने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. अखेर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन सीबीआय तपासाचे निर्देश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या ते सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत.
परमबीर सिंह यांच्यामागे सुद्धा आरोपांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. त्यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून या संबंधी कोर्टात खटले दाखल करण्यात आले आहेत. सध्या परमबीर सिंह सुद्धा वेगवेगळ्या आरोपांचा सामना करत आहेत.
दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?
परमबीर सिंह यांच्याविरोधात एसीबीने लुक आऊट नोटीस जारी केलेली नाही. पण अशी नोटीस जारी झाल्याचे वृत्त आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "कायदेशीर ज्या चूका आहेत, त्यातल्या गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. कोणाचे नाव त्यात आहे त्याला महत्व नाही" असे वळसे पाटील म्हणाले. "ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील व्हीडीओ संबंधातही कायदेशीर कडक नियमावली करण्याचा विचार राज्य शासन करत आहे. या संदर्भात राज्य शासन केंद्र सरकरला पत्र व्यवहार करेल" असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.