accident sakal
मुंबई

Maharashtra Accident Report: रस्ता सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा अन् निधी तरी राज्यातील रस्ते अपघात १३ टक्क्यांनी वाढले

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ ः राज्यातील रस्त्यांवरील अपघाताची आकडेवारी पाहता ते रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे चित्र आहे. रस्ता सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही अपघाताचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. गेल्या चार वर्षांमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात आणि मृत्यू झाले आहेत. एकूण ३३ हजार ३८३ अपघातांमध्ये १५ हजार २२४ नागरिकांचा बळी गेला आहे. २०२१-२०२२ अशा दोन वर्षांच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अपघात आणि मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे महामार्ग पोलिस विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.


अहवालानुसार २०१९ नंतर काही अपघात आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. २०२० मध्ये अपघात घटले होते. २०२१ नंतर पुन्हा अपघात आणि मृत्यूची संख्या वाढलेली दाखवण्यात आली. २०२० मध्ये २४,९७१ अपघातांमध्ये ११,५६९ मृत्यू झाले. त्यानंतर २०२१ मध्ये २९,४७७ अपघातांमध्ये १३,५२८ जणांचा मृत्यू झाला. अहवालाप्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ते अपघातामध्ये फक्त एक टक्का घट झाली. मृत्यूचे प्रमाण मात्र पाच टक्क्यांनी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. २०२१ मध्ये एकूण दोनशे अपघात झाले. त्यात ८८ जणांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये १९८ अपघातांमध्ये ९२ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

चार वर्षांतील राज्यातील आकडेवारी
वर्ष एकूण अपघात मृत्यू
२०१९ ३२९२५ १२७८८
२०२० २४९७१ ११५६९
२०२१ २९४७७ १३५२८
२०२२ ३३३८३ १५२२४

मुंबई-पुणे द्रुतगतीवरील स्थिती
वर्ष एकूण अपघात मृत्यू
२०१९ ३५३ ९२
२०२० १६१ ६६
२०२१ २०० ८८
२०२२ १९८ ९२

२०२२ वर्षातील आकडेवारी
महिना अपघात मृत्यू
जानेवारी २८१२ १३४३
फेब्रुवारी २७४८ १३३८
मार्च २८८४ १३६९
एप्रील २९१४ १३६४
मे ३१९७ १५०१
जुन २८७२ १३०३
जुलै २४३८ १०७४
आॅगष्ट २४२१ १०८०
सप्टेंबर २२९० १०००
आॅक्टोंबर २६७९ ११७४
नोव्हेंबर ३१३५ १३२२
डिसेंबर २९९३ १३५६
एकूण ३३३८३ १५२२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT