Sharad Pawar
Sharad Pawar esakal
मुंबई

Sharad Pawar: शरद पवार मुंबई जिंकणार? ६ पेक्षा अधिक जागा लढवण्याचा निर्धार! मतदारसंघ देखील ठरले?

Sandip Kapde

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आज मुंबईतील विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. २०१९ च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत ६ जागा लढवल्या होत्या. परंतु, यंदा लोकसभेतील यशानंतर, मुंबईत विधानसभेच्या निवडणुकीत ६ पेक्षा अधिक जागा लढवण्याचा निर्धार पक्षाने घेतला आहे.

यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा, अणुशक्ती नगर, कुर्ला, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, आणि शिवाजी नगर-मानखुर्द या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. मुंबई अध्यक्षा राखी जाधव या मतदारसंघांचा रिपोर्ट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर मांडणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलेल्या या काही विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या महाविकास आघाडीतील विद्यमान आमदार आहेत. लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १०० जागा लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होऊन जागांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या प्रत्येक पक्षाच्या जागा निश्चित झाल्यावर शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

पक्षाच्या या नव्या निर्धारामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या नेतृत्वात मुंबईतील राजकारण गाजवणार असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stampede Hathras: उत्तर प्रदेशात भीषण घटना! सत्संग समारंभात चेंगराचेंगरीत 23 महिलांसह 3 बालक अन् एका पुरुषाचा मृत्यू

PM Modi: मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ; लोकसभा अध्यक्ष विरोधकांवर प्रचंड संतापले

Ladki Bahin Yojana: पतीला सोडून पळून गेली पत्नी...'लाडकी बहीन योजने'च्या पैशांमुळे पकडली, नेमकं काय घडलं?

IND vs ZIM: भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा, 38 वर्षीय ऑलराऊंडकडे कर्णधारपद

Meta AI on WhatsApp : 'व्हॉटसअप युनिव्हर्सीटी' झाली अडव्हान्स; एका क्लिकवर मिळतेय खात्रीलायक माहिती

SCROLL FOR NEXT