Ajit Pawar esakal
मुंबई

Ajit Pawar: "आता काय जमिनी विकून निधी देऊ का?"; कॅबिनेट बैठकीत अजित पवार मंत्र्यांवर का संतापले?

Maharashtra Cabinet Meeting Ajit Pawar: कॅबिनेटमध्ये खडाजंगी- राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा चालू असताना काही मंत्र्यांनी निधीबद्दल तक्रार केली. हे ऐकून अजित पवारांनी खडसावले.

Sandip Kapde

राज्याच्या कॅबिनेट बैठकीत निधी वाटपावरून मोठा वाद झाला. काही मंत्र्यांनी निधी मिळत नसल्याची तक्रार केली आणि यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. "आता काय जमिनी विकून निधी देऊ का?" या शब्दात त्यांनी आपल्या नाराजीची भावना व्यक्त केली. अजित पवारांच्या या वक्तव्याने कॅबिनेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि आगामी काळात या वादाचे परिणाम काय होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॅबिनेटमध्ये खडाजंगी-

राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा चालू असताना काही मंत्र्यांनी निधीबद्दल तक्रार केली. हे ऐकून अजित पवारांनी खडसावले. आपल्या मतदारसंघात कामे करण्यासाठी निधी मिळत नाही, यावरून मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांनी धक्कादायक विधान केले आहे. दोन महिन्यांवर निवडणुका असताना आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधीची गरज आहे. या वादामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित या मंत्र्यांनी निधीची मागणी केली होती, पण मंत्र्यांनी मागितलेल्या अतिरिक्त निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला.

राज्यात सध्या सात महत्त्वाच्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. त्यामुळे जवळपास एक लाख कोटी रुपये त्यात खर्च होत आहेत. त्यामुळे निधीसाठी पैसे कुठून उभारणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

आज मंत्रिमंडळात निधीच्या संदर्भात अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी आपली नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील तणाव वाढला आहे आणि आगामी निवडणुकांसाठी हा वाद कसा मिटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT