मुंबई

आजच्या मीटिंगमध्ये मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केलीये 'ही' मागणी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात कोरोनाची सुरवात होऊन आता शंभर दिवस पूर्ण झालेत. अशात भारतासारख्या मोठ्या देशात कोरोनाला रोखण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न केले जातायत. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी  करण्यात आलाय. भारतातील लॉकडाऊन हा जगभरातील सर्वात मोठा लॉकडाऊन मानला जातोय. 

येत्या १४ तारखेला भारतातील लॉकडाऊन संपतोय. आता याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधलाय. यामध्ये पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्या त्या राज्यातील कोरोना आणि त्या त्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला.   

दरम्यान मुंबईत आणि  एकूणच महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महाराष्ट्रातील लॉकडाऊन हा 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या पूर्वीच देशातील इतर काही राज्यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवलंय. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना महाराष्ट्र राज्याला कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याचं देखील सांगितलं. या परिस्थितीत महाराष्ट्राला तात्काळ आर्थिक मदत दिली जावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

आता महाराष्ट्रातील आणि एकंदर देशभरातील लॉकडाऊन उठवला जातो का ? याबाबत मोठी घोषणा होऊ शकते. 

आयुष डॉक्टरांनाही कोव्हिड- 19 आजाराचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात

कोरोनापासून होणाऱ्या कोव्हिड-19 च्या संसर्गाचा वेग पाहता डॉक्टर तसेच हेल्थ केअर कर्मचारी कमी पडता कामा नयेत यासाठी आयुष मंत्रालयाकडून आयुष डॉक्टरांनाही कोव्हिड- 19 आजाराचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.‌ कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमधील डॉक्टर्स कार्यरत आहेत. पण, ही संख्या कमी पडू नये आणि रुग्णांना वेळच्या वेळी उपचार मिळावेत यासाठी आयुष डॉक्टरही कोरोनाच्या लढाईत सहभाग घेणार आहेत.

maharashtra chief minister uddhav thackeray appeals to PM modi to increase lockdown on maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

SCROLL FOR NEXT