मुंबई - मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरु राहण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेऊन मध्यस्थी केली त्यामुळे हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे.
वाडिया रुग्णालयाला राज्य शासनाकडून 44 करोड रुपये अदा केले जाणार आहेत. तर बृहन्मुंबई महापालिकेला 22 कोटी रुपये तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कुठल्याही परिस्थित वाडिया रुग्णालय बंद होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वाडिया रुग्णालय सुरु राहण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. याचसोबत इतर प्रश्नांसंदर्भात देखील तातडीची बैठक येत्या १० दिवसात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतखाली घेतली जाणार असल्याची देखील माहिती समोर येतेय.
लालबाग परळमधील तसंच मुंबईतील गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा स्वस्तात देणारे वाडिया रुग्णालय बंद होऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीपासूनच घेतली होती. आज नस्ली वाडिया हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीस उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व इतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची देखील या बैठकीस उपस्थिती होते.
महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु राहील तसेच यातील कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्या देखील अबाधित राहतील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
maharashtra cm uddhav thackeray took decision of alloting 44 crore to wadia hospital
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.