मुंबई

धक्कादायक ! 'या' आजारामुळे महाराष्ट्रात दररोज 17 लोकं गमावतात जीव..

सकाळ वृत्तसेवा

TB  नियंत्रणावर प्रशासन नेहमीच मोठे दावे करतं. मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक बाब समोर येतेय. यामध्ये 2018 मध्ये एकट्या महाराष्ट्रातून तब्बल 6476 लोकांनी आपला जीव गमावला आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाला 17 जणांचा TB मुळे मृत्यू झालाय. जाणकारांच्या मते वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने आणि औषधांची उपलब्धता न  होवू शकल्याने रुग्णांची परिस्थिती गंभीर होते आणि त्यांचा मृत्यू होतो.  

जोपर्यंत योग्य उपचार आणि औषधांचा पुरवठा नीट होत नाही, तोपर्यंत TB ने होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी होणार नाही असं मत TB बद्दल प्रबोधन करणारे कार्यकर्ते गणेश आचर्य यांनी म्हटलंय   

राज्यातील सध्याचं TB चं प्रमाण पाहता, गेल्या काही वर्षात या संबंधित तपासयंत्रणा वाढवण्यात आली आहे. मात्र अनेकदा नोंदणीकृत रुग्ण अनेकदा उशीरा उपचारासाठी येतात. म्हणून मृत्युचं प्रमाण वाढल्याचं महाराष्ट्र आरोग्य सेवेच्या  संचालिका डॉक्टर अर्चना पाटील यांनी म्हटलंय.  

TB मुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी 

वर्ष  मृतांची आकडेवारी 
2016 6121
2017 5066
2018 6476

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशात लोकसभेत देखील या मुद्यावर आवाज उठवला गेला. यामध्ये उत्तर देताना 2018 मध्ये देशभरात 69,375 लोकांनी आपला जीव गमावला असल्याची बाब समोर आली आहे. यामधील महाराष्ट्रातील 6467 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. TB मुळे प्राण गमावणाऱ्या नागरिकांमध्ये उत्तर प्रदेशाचा पहिला तर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागलाय.  

याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TB निर्मुलन अभियान 2025 ची  घोषणा केलीये.  मात्र जाणकारांच्या मते हे अत्यंत कठीण आव्हान असल्याचं बोललं जातंय.  2017 ची 5056 ची आकडेवारी वाढून 2018 मध्ये 6476 वर गेलीये. म्हणजे TB मुळे प्राण गमावणाऱ्या नागरिकांमध्ये 28 टक्के वाढ झालीये. यामध्ये सर्वाधिक TB रुग्णांची नोंदणी मुंबईतून केली गेलीये. त्यामुळे मुंबईकरांना TB पासून सावधान राहण्याचं आवाहन आता करण्यात येतंय.   

दरम्यान, वेळेत उपचार मिळत नसल्याने आणि वेळेवर औषधांची मागणी पूर्ण होत नसल्याने TB मुळे जीव गमावणे अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने वेळीच  योग्य पावले उचलून TB निर्मुलन कशा प्रकारे करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. 

Webtitle : this dangerous deceases is taking life of 17 people in a day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT