मुंबई

'ही' परवानगीही मिळाली, मुंबईतील मद्यप्रेमींसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील मद्यप्रेमींसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आलीये. कारण आता मुंबईकर त्याच्या घराजवळील हॉटेल किंवा बारमधून मद्याची होम डिलेव्हरी मागवू शकणार आहेत. खरंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आजही आढळून येतायत. मात्र मिशन बिगिन अंतर्गत मुंबईत जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी आणि सरकारचं आर्थिक चक्र फिरतं करण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकर आता जवळच्या बार किंवा हॉटेलमधून मद्याची होम डिलेव्हरी मागवू शकणार आहेत. 

मुंबई शहर व मुंबई उपनगरी जिल्हाधिकाऱ्यांनी एफएल -III परवानाधारक बार आणि रेस्टॉरंट्सला सीलबंद बाटल्यांमध्ये होम डिलिव्हरीद्वारे दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टाच्या देण्यात आली.  अतिरिक्त सरकारी वकील अभय पत्की याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची देखील आहे. कारण पत्की यांच्या माहितीप्रमाणे, सध्या हॉटेल्स आणि बारमध्ये मद्याचा साठा उपलब्ध आहे, केवळ हा उपलब्ध मद्यसाठा संपवण्यासाठी ही परवानगी आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय. 

ऍडव्होकेट वीणा थंदानी यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बार मालकांनी त्यांच्या लायसन्सेस साठी मोठा खर्च केलाय. मात्र दीर्घकाळ सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे या सर्वांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतोय.

अशातच या बार आणि रेस्टॉरंट्सकडे असलेला मद्यसाठा येत्या काळात एक्स्पायर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अधिकचं नुकसान होऊ शकतं असंही त्यांनी आपुल्या याचिकेत नमूद केलं होतं.        

दरम्यान राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टाच्या एफएल -III परवानाधारक बार आणि रेस्टॉरंट्सला घरपोच मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे हे कळवण्यात आल्यानंतर वीणा थंदानी यांनी आपली याचिका मागे घेतलीये. 

maharashtra government gave permission to bar and restaurants owners for giving home delivery of liquor 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT