मंत्री वडेट्टीवार यांनी लॉकडाउनबद्दल केली होती घोषणा
मुंबई: राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असून हळूहळू पाच लेव्हलच्या वर्गवारीनुसार (5 Level District System) विविध जिल्ह्यांतील लॉकडाउन (Lockdown) उठवला जाईल, अशी घोषणा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काल केली. या घोषणेनंतर काही वेळातच राज्य सरकारच्या DGIPR कडून हे निर्बंध हटवण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच, नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना कळवण्यात येतील, असं DGIPR कडून स्पष्ट करण्यात आलं. घडलेल्या प्रकारानंतर विजय वडेट्टीवार यांनीही मिडीयाशी बोलताना, मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, (Lockdown Confusion) असं स्पष्टीकरण दिलं. या एकंदर प्रकरणानंतर विरोधकांनी त्यावर टीकास्त्र सोडलं. पण राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मात्र सावध भूमिका घेतली. (Maharashtra Lockdown Confusion NCP Jayant Patil takes cautious stand after Vijay Wadettiwar clarification)
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकसंबधीची घोषणा केली. त्यानंतर राज्य शासनाने या घोषणेला पूरक नसलेली एक प्रेस नोट जारी केली. त्यानंतर जेव्हा वडेट्टीवार यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा पत्रकार परिषदेत आपण घाईघाईत 'तत्वत:' हा शब्द बोललो नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यावरून बराच वादंग झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेकांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. पण जयंत पाटील मात्र वेगळीच भूमिका घेताना दिसले. "विजय वडेट्टीवार काय म्हणाले हे मला माहिती नाही. मला त्याची कल्पना नसताना मी त्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील", अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
फडणवीसांनी काय केली होती टीका...
राज्यातील मंत्र्याने जे सांगितलं त्यापेक्षा वेगळंच काहीसं राज्य शासनाच्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे राज्य सरकारमधील विसंवाद दिसून आल्याची चर्चा आहे. त्यावर फडणवीस यांनी एक फोटो पोस्ट करत या प्रकारावर चपखल भाष्य केलं. "काय सुरू, काय बंद... कुठे आणि केव्हापर्यंत... लॉक की अनलॉक... पत्रकार परिषद की प्रेस रिलीज... अपरिपक्वता की श्रेयवाद", असे पाच सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.