मुंबई

"मोदींनी लॉकडाउन करताना कुणाच्या खात्यात पैसे जमा केले होते का?"

विराज भागवत

मुंबई: राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. परिणामी लॉकडाउन लावण्यात येणार असल्याची चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत गोरगरिबांचा आणि हातावर पोट असणाऱ्यांचा विचार केला जायला हवा या विचारातून भाजपचे नेते लॉकडाऊनदरम्यान विविध पॅकेजेसबाबत बोलत आहेत. भाजपच्या पॅकेजेस संदर्भातील मागण्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला. "देशात लॉकडाऊन करताना पंतप्रधान मोदी यांनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याची योजना आखली नाही. त्यामुळे केवळ राजकारण करायचं म्हणून हे करा, ते करा असं बोलणं योग्य नाही", अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावलं.

"महाराष्ट्रात अर्थव्यवस्था ठप्प होईल अशी परिस्थिती येऊ न देता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होत आहेत. त्या चर्चांच्या अंती योग्य तो निर्णय होईल. पण जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका सांगत आहेत, ते योग्य करत नाहीत. राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे, ते निश्चितपणे सरकार करेल", असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

गेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यात बांधकाम मजुरांना केंद्राप्रमाणे पैसे देण्यात आले. प्रत्येक जिल्हयात जो गरीब मजुर वर्ग आहे त्यांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी सरकारने चार महिने सगळी व्यवस्था केली होती. आताही गरज पडल्यास सरकार निश्चितरुपाने तशी व्यवस्था करेल. देवेंद्र फडणवीस आमच्या सरकारला शिकवत आहेत. त्यांनी गुजरातमध्ये हॉस्पिटलशिवाय लोकं मरत आहेत, त्या गुजरात मॉडेलची परिस्थिती बघितली पाहिजे", असा टोला त्यांनी लगावला.

"लॉकडाऊनमध्ये राज्यात ज्या पध्दतीने कामे सुरू आहेत, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कौतुक करत आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री महेंद्र पांडे मुंबईत आले असता, त्यांनीही कौतुक केले आहे. अशाप्रकारची कामे कुठल्याही राज्यात झाली नाहीत. उत्तरप्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाही. लॉकडाऊनच्या काळात इथून निघताना मजुरांनी राज्य सरकार जिंदाबाद. मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा दिल्या, परंतु तिथे गेल्यावर भाजप मुर्दाबाद केलं हे भाजपच्या लोकांना कळलं पाहिजे", असंही मलिक यांनी सांगितलं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT