Mantralaya sakal media
मुंबई

Mantralaya: मंत्रालयात चाकू घेऊन जाणाऱ्याला अटक! कोण आहे 'ही' व्यक्ती?

दुपारीच मंत्रालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकीच्या फोननं खळबळ उडाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : दुपारी मंत्रालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्याच्या फोननंतर आता धारदार चाकू घेऊन मंत्रालयात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती मराठवाड्यातील रहिवासी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Maharashtra Mantralaya Knife carrying man arrested Know who is this person)

सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील मंत्रालयाच्या नव्या इमारतीत धारदार चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करत होता. हा व्यक्ती उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा इथला असल्याची माहिती मिळते आहे. (Latest Marathi News)

मंत्रालयाच्या आवारात सुरक्षा रक्षकांनी त्याची बॅग स्कॅन केली त्यात त्याच्या बॅगेत काहीतरी धातूची वस्तू असल्याचं डिटेक्ट झालं. त्यानंतर या व्यक्तीची बॅगची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर यात एक धारदार चाकू आढळून आला. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, हा चाकू बँगेत घेऊन संबंधित व्यक्ती मंत्रालयात जात असल्यानं एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं, यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT