मुंबईः विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात खबरदारी म्हणून प्रत्येकांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल ४१५ जणांची चाचणी घेतली गेली त्यातल्या २१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यात काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सचिव मंत्री, विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह टेस्ट आढळल्यामध्ये मंत्रालय अधिकारी कर्मचारी विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांचे लोक देखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या लोकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यांना विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होता येणार नाहीय.
पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षांसह अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे.
Maharashtra Monsoon Session Start Today 21 Minister Corona Positive
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.