Maharashtra mumbai news Doctors Operate On 9-Year-Old Boys Private Part Instead of Injured Leg In Thane Parents Allege  Esakal
मुंबई

Thane News: धक्कादायक! दुखापत झाल्यानं 9 वर्षाच्या मुलाला रुग्णालयात केलं दाखल; डॉक्टरांनी पायाऐवजी प्रायव्हेट पार्टवर केली शस्त्रक्रिया, नेमकं काय घडलं?

अंकिता खाणे (Ankita Khane)

पृथ्वीवर कुणाला देवाचे अवतार म्हणता येत असेल तर तो डॉक्टर, कारण डॉक्टर जीवदान देतात असं म्हटलं जातं, पण मुंबईतील ठाणे परिसरात एका डॉक्टरने ९ वर्षांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाच्या पालकांनी डॉक्टरांवर चुकीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप केला आहे. पालकांचे आरोप खूपच गंभीर आहेत. डॉक्टरांनी पायाची शस्त्रक्रिया करण्याऐवजी मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात ठाण्यातील शाहपूरमध्ये खेळताना ९ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलावर चुकीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टरांनी पायाऐवजी मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, नंतर डॉक्टरांना चूक लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली.

मुलाच्या पालकांची प्रतिक्रिया

पालकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यांना १५ जून रोजी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी जखमी पायाच्या ऐवजी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केली. मात्र, नंतर डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी जखमी पायावर शस्त्रक्रिया केली.

याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दोन्ही शस्त्रक्रियांची माहिती कुटुंबीयांना दिल्याचे सांगितले आहे, मात्र कुटुंबीयांनी डॉक्टरांचे स्पष्टीकरण फेटाळून लावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT