Mumbai Pune Expressway Traffic Jam Esakal
मुंबई

Mumbai Pune Expressway Traffic Jam: सलग सुट्ट्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; आजही वाहतूक धीम्या गतीनं सुरू

सलग ३ सुट्ट्या असल्यामुळे एक्स्प्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. आजही मुंबई पुणे महामार्गावर वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

सलग ३ सुट्ट्या असल्यामुळे एक्स्प्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. आजही मुंबई पुणे महामार्गावर वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे. या मार्गावर अनेक वाहने बंद पडली होती. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात 10 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी पुण्याकडे जाताना वाहतूक रखडली आहे. अडोशी टनेलच्या अगोदर पासून अमृताजन ब्रिज पर्यंत व पुण्याच्या दिशेला खंडाळ्याकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काल(शनिवारी) संध्याकाळपासून मार्गांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळ सण अशा तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. विशेषतः मुंबईतील पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे.

सुट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोरघाटात सुरू असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहनचालकांना शनिवारपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात पुणे लेनवर आडोशी बोगदा ते मॅजिक पॉइंट, टाटा कॅम्प, बोरघाट पोलिस चौकी दस्तुरी, अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा दरम्यान तीन ते चार किलोमीटर तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

खंडाळ्यात जुन्या महामार्गावर ड्युक्स हॉटेल ते राजमाची उद्यान दरम्यान वाहतूक विस्कळित झाली आहे. लोणावळ्यातही महामार्गावर मुनीर हॉटेल ते अपोलो गॅरेज दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्यावतीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नादुरुस्त वाहनांमुळे कोंडीत भर

बोरघाटात शनिवारी अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली. बोरघाटात जुनी अवजड वाहने गरम होतात. त्यामुळे गाड्यांचे क्लचप्लेट खराब होऊन, त्या बंद पडतात. दिवसभरात पंधरा-वीस गाड्या या पद्धतीने बंद पडत असतात. आजही असेच झाले. मात्र, सुट्ट्यांमुळे घाटात गर्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पर्यटनास तसेच गावी निघालेल्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसला. कोंडीमुळे नागरिकांना रस्त्यावर तासन्‌तास ताटकळत राहावे लागले. महिला आणि लहान मुलांचे खाण्या-पिण्यावाचून मोठे हाल झाले. खोपोली, खंडाळा येथील काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मदत करत बिस्किटे व पाण्यासह वाहने दुरुस्त करण्यासाठी मदत केली.

खंबाटकी घाटात वाहतूक आठ तास ठप्‍प

पुणे- बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील पाचव्‍या वळणावर काल आठच्‍या सुमारास दोन ट्रक बंद पडल्‍याने आणि सलगच्‍या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्‍या वाढल्‍याने सातारा, महाबळेश्‍‍वरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक जवळपास आठ तास ठप्‍प झाली. पोलिसांच्‍या प्रयत्‍नानंतर सायंकाळी चारपासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

नियोजनाने अनेक जण महाबळेश्‍‍वर, गोव्‍याकडे निघाले आहेत. त्‍यामुळे आज शनिवारी महामार्गावर वाहनांची संख्‍या मर्यादेबाहेर वाढली होती. या वाहनांना दोन्‍ही ठिकाणी जाण्‍यासाठी महामार्गावरील खंबाटकी घाटाचाच वापर करावा लागतो. त्‍यातच या घाटातील पाचव्‍या वळणावर सकाळी आठच्‍या सुमारास दोन ट्रक बंद पडले. त्‍यानंतर मागून येणारी वाहने वाढू लागली आणि वाहतूक कोंडीही सुरू झाली. हळूहळू घाटात मोठी कोंडी झाली, तर काही वाहने गरम होऊन बंद पडली. त्‍यामुळे घाटातील वरच्‍या वळणांवरून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत खाली खंडाळ्यापर्यंत वाहनांच्‍या रांगा लागल्‍या. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक बोगद्यामार्गे वळविली. दुपारी मार्गावरील वाहने कमी होऊन वाहतूक सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT