मुंबई: सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारची कानउघाडणी केली. "लसीकरणा संदर्भात केंद्राने महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र मोठं राज्य आहे. या राज्यात मुंबईसारखं शहर आहे. निवडणुका असणाऱ्या राज्यात केंद्राने मदत केली आहे. पण इतर राज्यांनाही समान पद्धतीची मदत करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील लोकही भारतीयच आहे हे विसरू नका", असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला.
महाराष्ट्र देशासाठी कायमच दिशादर्शक!
"महाराष्ट्र विकास आघाडी हा राज्यातील एक यशस्वी प्रयोग आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन भिन्न विचारांचे पक्ष सध्या राज्याचे सरकार चालवत आहेत. देशातील सर्व भाजपविरोधी पक्षांनी यापासून धडा घ्यायला हवा. अशा प्रकारची आघाडी युपीएच्या माध्यमातून नवी आघाडी निर्माण करावी असा विचार ममतादीदींना मांडला आहे. महाराष्ट्राने देशाला नवीन मार्ग दाखवला आहे. त्यावरून कसं पुढे जायचं ते सर्व विरोधी पक्षांनी मिळून ठरवण्याची गरज आहे", असं संजय राऊत म्हणाले.
ममतादीदींच्या पत्राबाबत....
"ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीसंदर्भात देशात नक्की काय होतंय याबद्दलचं पत्र प्रमुख २७ विरोधी पक्षनेत्यांना पाठवलं आहे. पत्रावर प्रत्येक नेत्यांनी विचार करायचा आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय ममता बॅनर्जींनी म्हणाल्याप्रमाणे लोकशाहीवरील संकट दूर होणार नाही. विरोधी पक्षांनी एकत्रित चर्चा करून दिशा ठरवणं गरजेचं आहे", असा सल्ला राऊतांनी सर्व पक्षांना दिला.
शरद पवार-उद्धव ठाकरे भेट कधी?
"शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. उद्धव ठाकरे फोनवरून त्यांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे पवारांची भेट नक्की कधी घेणार आहेत हे मला माहिती नाही. पण जेव्हा ते भेट घेणार असतील तेव्हा सगळ्यांना कळवतील", असं राऊत पत्रकारांना उत्तर देताना म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.