Fireworks  sakal media
मुंबई

उद्या फटाक्यांच्या आवाजाची चाचणी; विक्रीबाबतही नवे निर्देश येण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिवाळीत (Diwali festival) फटाक्यांमुळे (fireworks) ध्वनिप्रदूषण वाढण्याची (Noise pollution) शक्यता आहे. त्यामुळे आवाज करणाऱ्या फटाक्यांवर यंदादेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी बाजारात दाखल झालेल्या फटाक्यांच्या आवाजाची चाचणी (Fireworks noise test) गुरुवारी (ता. २१) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय केमिकल्स् अॅण्ड फर्टिलायझरजवळील मैदानावर फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आवाज फाऊंडेशन या संस्थेच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला आहे. यानंतर फटाक्यांच्या विक्रीबाबत नवे निर्देश जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे मुंबईतील फटाक्यांचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सांगितले.
दिवाळी उत्सवात फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली जावी, याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गेल्या काही वर्षांपासून जनजागृती केली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत असून दरवर्षी फटाके वाजवण्याच्या प्रमाणात घट होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kothrud Assembly Election : चंद्रकांत पाटीलांचा जीव भांड्यात! बंडखोराने घेतली माघार, पेढा भरवून केलं मनोमिलन

Imperial Blue: भारतातील मोठा व्हिस्की ब्रँड विकला जाणार; दोन कंपन्या खरेदीच्या शर्यतीत, कोण आहे आघाडीवर?

मेरे करण अर्जुन आएंगे नही, आगये! थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार शाहरुख सलमानचा 'करण-अर्जुन'; वाचा तारीख

तुमको कुछ नहीं पता है! पत्नी साक्षीसमोर MS Dhoniचंही नाही चालत;'कॅप्टन कूल'नं सांगितला भन्नाट किस्सा, Video Viral

Latest Maharashtra News Updates : आमदार चेतन तुपे भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT