मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा परीक्षा पुढे ढकल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर महिन्यातील दोन परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. 1 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर या दोन दिवशी आयोजित केलेल्या परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत.
या परीक्षांचे वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाची बातमी : अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आराक्षणाबाबत दिलेल्या निर्णयानंतर मराठा संघटनांनी राज्य सेवा परीक्षा न घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेनंतर आयोगाने 1 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे.
महत्त्वाची बातमी : "राज्यपाल पदावर बसलेल्या व्यतीच्या वागण्यावर खेद वाटतो"; शरद पवारांचं थेट मोदींना पत्र
या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
(संकलन - सुमित बागुल )
Maharashtra Public Service Commission postponed two examinations in November
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.