Marathwada Vidarbha rain imd alert unseasonal rain today latest marathi update update  
मुंबई

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Vrushal Karmarkar

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे लोक रस्त्यांवर अडकून पडलेल्याचे चित्र पहायला मिळाले. तसेच मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. तर पुणे शहरात पावसाने नागरिकांना हैराण केले. पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत झाली आहे. ठाण्यात २४ तासांत वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसीने गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान खात्याने महाराष्ट्रात फक्त पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर धुळे, पुणे, नाशिक, रायगड, ठाणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांसाठी पिवळा आणि हिरवा इशारा आहे. उद्या राज्यात हवामान खराब राहिल्यास त्याचा परिणाम पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर आणि कार्यक्रमावर होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मुंबईत आज सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याआधी बुधवारी (२५ सप्टेंबर) रात्री ९ वाजेपर्यंत मुंबईतील पवई येथे सर्वाधिक २५७.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मानखुर्द येथे २३९ मि.मी.ची नोंद झाली आहे. विक्रोळी, जोगेश्वरी, अंधेरी येथेही मुसळधार पावसाची नोंद झाली.

कोणत्या परिसरात किती पाऊस पडला?

पासपोली पवई महानगरपालिका शाळा (पवई) - २५७.८ मिमी

मानखुर्द अग्निशमन केंद्र - २३९.६ मिमी

एन विभाग कार्यालय- २३३.१ मिमी

नूतन विद्यामंदिर - २३१.८ मिमी

टागोर नगर महानगरपालिका शाळा (विक्रोळी) - २२७.६ मिमी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर केंद्र, जोगेश्वरी - १८० मिमी

मरोळ अग्निशमन केंद्र- १५४.६ मिमी

मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (अंधेरी) - १५० मिमी

शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा - १३९.२ मिमी

के पूर्व विभाग कार्यालय - १२६.२ मिमी

नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा - १२५.८ मिमी

पी दक्षिण विभाग कार्यालय - १२३.९ मिमी

प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा, शीव (सायन) - ११६.६ मिमी

कुलाबा उदंचन केंद्र - ११४.३ मिमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mains 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; महेश घाटुळे परीक्षेत पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल

2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

'गुड टच अँड बॅड टच' ची कार्यशाळा सुरू होती, तरुणीनं असं काही सांगितलं की पोलिसांना बोलवावं लागलं, काय घडलं?

Kalyaninagar Accident प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जितिया सणादरम्यान मोठी दुर्घटना! 43 जणांचा बुडून मृत्यू, घटनेत 37 मुलांचा समावेश, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT