Sanjay-Raut-Devendra-Fadnavis 
मुंबई

"संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाची नक्कीच नोंद ठेवेल"

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सूचक इशारा

विराज भागवत

बेळगाव सीमा प्रश्न हा महाराष्ट्र आणि कर्नाटकसाठी नवीन नाही. सध्या बेळगावात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. शुभम शेळके हे तेथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी शेळके यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रश्नी वेगळी भूमिका घेतली असल्याचे दिसले. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांबद्दल नाराजी व्यक्त केली. "देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही. मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या उपस्थितीत विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत. पाठिंब्याची गरज होती त्यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं की बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या, पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्याची नक्कीच नोंद ठेवेल", सूचक इशारा शिवसेनेचे संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

"बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता, महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे. एकीकरण समितिचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. राज्यात मतभेद असले तरी चालतील पण ते मतभेद तिथे दिसायला नकोत. शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी.. प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेलं पाहिजे. कारण तिथे लोकांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळतोय आणि म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार तेथे चांगली मुसंडी मारतील", असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

राज्यातील सरकार कधी कोसळेल हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, "अजित पवार यांना चांगलं माहिती आहे की सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनलं आणि दुपारी कोसळलं, त्यानंतर पुन्हा जे सरकार बनलं आहे, त्या ऑपरेशनचे सर्जन अजित पवार आहेत."

"आम्हाला मराठी प्रेमासाठी कोणी ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही. ज्या बेळगावसाठी 1967 साठी आंदोलन करून शिवसेनेने 67 हुतात्मे दिले आणि बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला, त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही. पण तुमची भूमिका पाहून आता तुमच्या मराठीप्रेमाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे", असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

SCROLL FOR NEXT