Navi Mumbai Assembly Elections ESakal
मुंबई

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीत महायुती जागांचा पेच वाढणार आहे. तर अशातच शरद पवार गट नवा डाव खेळणार असल्याचे समोर आले आहे.

Vrushal Karmarkar

सुजित गायकवाड, नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीत जागांवर निर्माण झालेल्या तिढा अखेर महायुतीला फुटीच्या उंबरठ्यावर घेऊन आला आहे. माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक यांना दोन जागा मिळत नसल्याने अखेर नाईक कुटुंबीयांकडून दुसरा पर्यायाचा शोध सुरू झाल्याचे समजते आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आदींवर सोबत चर्चा झाल्यानंतर राष्‍ट्रवादीचे शरद पवार गटासोबत सूत जुळल्याचे समजते. याबाबत नाईक समर्थकांनी पुन्हा घर वापसी करण्याचा सल्ला नाईक यांना दिल्याचे समजते. त्यामुळेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांचा पक्षप्रवेश खोळंबल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात रंगली आहे.

नोव्हेंबरच्या २० तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने प्रचाराकरीता अतिशय कमी वेळ राहिल्याने राजकीय पक्षांच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. परंतु नवी मुंबईत महायुतीच्या मातब्बर नेत्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केल्याने महायुतीमधील पक्षश्रेष्ठींपुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ऐरोलीची एक जागा असताना नाईक कुटुंबीयांनी बेलापूरच्या जागेवर दावा केल्याने भाजपमध्ये अडचण निर्माण झाली आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नाईकांना फक्त एकच जागा देण्याचे कबूल केले आहे.

परंतु नाईक कुटुंबीयांचे एका जागेवर समाधान होत नसल्याने भाजपवर दबाव आणण्यासाठी उबाठा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटासोबत बोलणी केल्याची चर्चा सुरू आहेत. त्यापैकी शरद पवार गटाकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातही उपनेते विजय नाहटा यांनी उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच बंड करून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची वाट धरली आहे. परंतु दोघांनाही शरद पवार गटाकडून सबुरीचा सल्ला दिला जात असल्याचे समजते आहे.

बेलापूरमध्ये भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांची जागा पक्की केल्याची चर्चा आहे. गेल्या दहा वर्षांत म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा सपाटा आणि दांडगा जनसंपर्काच्या जोरावर म्हात्रे यांच्या उमेदवारीला भाजप श्रेष्टींकडून पसंती मिळत असल्याचे चिन्ह केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दौऱ्या दरम्यान स्पष्ट झाले होते. त्यामुळे नाईकांच्या वाट्याला फक्त ऐरोली मतदारसंघ येत असल्याने शरद पवार गटाचा पर्याय चांगला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

नवी मुंबईत मोडणाऱ्या ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही जागा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या. काळांतराने पक्ष बदलामुळे या दोन्ही जागांपैकी एक जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि एक जागा शरद पवार गटाकडे आली. सध्या तीन पक्षांच्या महायुतीच्या काळात नवी मुंबईत शरद पवार गटाकडे एकाही ठिकाणी खमका उमेदवार नाही. अशा परिस्थितीत महायुतीमधील स्वयंघोषित उमेदवारांना जागा मिळत नसल्याने शरद पवार गटाने त्यांची दारे खुली करुन राजकीय डाव खेळला आहे.

एकीकडे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना दार खुले करून भाजपमधील ऐरोली आणि बेलापूरमधील नेत्यांना दारे उघडी केली आहेत. अशात नाईक कुटुंबीयांसोबतही चर्चा करून महायुतीवर दबाव निर्माण केला आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनीही प्रबळ दावेदारी केली आहे. नाईक समर्थक नगरसेवक गळाला लावून आणि गावठाण व झोपडपट्टी बहुल भागावर ऐरोली मतदार संघावर चौगुले यांनी चांगली पकड निर्माण केली आहे.

ही जागा भाजपची असल्याने चौगुले यांना वडार आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद देऊन बोलवण केल्याचा प्रयत्न महायुतीने केला आहे. चौगुले हे पद स्विकारले असले, तरी ते मनाने नाराज असल्याची चर्चा त्यांचे समर्थक करीत आहेत. अशा परिस्थितीत चौगुले यांना चांगला पर्याय मिळाल्यास ऐरोलीत बंडाचे ढग गोळा होऊ शकतात, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

SCROLL FOR NEXT