maintain law and order Tadipaar Hooligan in Ulhasnagar Many Hooligans on Waiting List mumbai sakal
मुंबई

उल्हासनगरात रेकॉर्डवरील गुंडांच्या तडीपारांची हाफसेंच्युरी,अनेक गुंड वेटिंगलिस्टवर

परिसरात दहशत व कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडांना तडीपार करण्याची मोहीम उल्हासनगरात सुरू

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : खून,खुनाचा प्रयत्न,खंडणी या गुन्ह्यांसोबतच हाणामाऱ्या करून परिसरात दहशत व कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडांना तडीपार करण्याची मोहीम उल्हासनगरात सुरू ठेवली आहे.पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काही महिन्यातच तडीपारांची हाफसेंच्युरी पूर्ण झाली असून अनेक गुंड तडीपरीच्या वेटिंगलिस्टवर आहेत.अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते,विद्यमान सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी झोपडपट्टी दादांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती.उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम,मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी काढलेल्या लिस्टप्रमाणे 48 गुंडावर तडीपार,मकोका अंतर्गत नाशिक,पुणे येरवडा कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली होती.

आता पोलीस उपायुक्त पदाचा नव्याने पदभार स्वीकारणारे सुधाकर पठारे यांनी कुलदीप मुकेश कंजानिया उर्फ भोळा आणि हिरा उर्फ हिरो कुकरेजा या गुंडांना तडीपार केले आहे.भोळा याच्यावर 4 व हिरा याच्यावर 10 गुन्ह्यांची नोंद आहे.आणखीन काही गुंड वेटिंगलिस्टवर असून उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी या सराईत गुंडावर तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT