doctor esakal
मुंबई

डॉक्टरनेच महिला सहकाऱ्याचा केला विश्वासघात, मालाडमधील घटना

महिला डॉक्टर एकटी असल्याचे पाहून त्याने...

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत एका डॉक्टरनेच आपल्या महिला सहकाऱ्याचा विश्वासघात केला. सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मालाडमधील हॉस्पिटलच्या (malad hospital) कार्यालयात रविवारी ही घटना घडली. मालाड पश्चिमेला लिंक रोडवर (link road) असलेल्या हॉस्पिटलमध्ये आरोपी आणि महिला डॉक्टर काम करतात. रविवारी संध्याकाळी महिला डॉक्टर हॉस्पिटलच्या एका केबिनमध्ये एकटी असताना ही घटना घडली. (Malad cops book doctor who molested colleague at malad hospital)

आरोपी डॉक्टर तिथे आला. महिला एकटी असल्याचे पाहून त्याने तिला मिठी मारली. डॉक्टरच्या या कृतीने महिला घाबरली. तिने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली व तिथून पळ काढला. या प्रकाराने भांबावून गेलेल्या त्या महिला डॉक्टरला नेमके काय करावे ते सुचत नव्हते. तिने तिच्या काही सहकाऱ्यांना हा प्रकार सांगितला.

त्यांच्या सल्ल्यावरुन ती मालाड पोलीस ठाण्यात गेली व आरोपी डॉक्टर विरोधात तक्रार नोंदवली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. "महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन आम्ही आरोपी विरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी डॉक्टर फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे" असे दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT