मुंबई

मालाडमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात कोरोनाचे नियम धाब्यावर

सकाळवृत्तसेवा

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळेच सार्वजनिकरित्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, घालून दिलेल्या या नियमांचं नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. मालाड-मालवणी येथे काँग्रेसच्या नगरसेवकांकडूनच सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे. इतकचं नाही तर याप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकारालादेखील मारहाण करण्यात आली आहे. 

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे लग्नसमारंभ, अंत्यविधी किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची संख्या ठरवण्यात आली आहे. मात्र, मालाड मालवणीमध्ये सेल्फी पॉइंटच्या उद्धाटनावेळी काँग्रेसच नगरसेवकांनीच शोबाजी केल्याचं समोर आलं.
मालवणी येथे स्थानिक नगरसेविका सलमा अलमेलकर यांच्यावतीने सेल्फी पॉइंट सुरु करण्यात आला. या सेल्फी पॉइंटच्या उद्घाटनाप्रसंगी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती. मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मतदार संघाचा भाग असलेल्या मालवणी गेट क्रमांक सात येथे हा सेल्फीपॉईंट तयार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवही अस्लम शेख यांचे छायाचित्र ठळकपणे छापण्यात आले आहे.

रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची गर्दी होतीच त्याच बरोबर अनेकांची मास्कही नाकाखाली आले होते. सामाजिक अंतराचा विसरही या कार्यकर्त्यांना पडला होता. त्यामुळे हा संबंधित प्रकार पाहिल्यानंतर सकाळच्या बातमीदाराने प्रश्न उपस्थित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली.

या कार्यक्रमात झालेली गर्दी, सामाजिक अंतराचा उडालेला फज्जा या बद्दल ‘सकाळ’चे मालाड येथील बातमीदार निसार यांनी नगरसेविका सलमा अलमेलकर यांना प्रश्‍न विचारला.त्यावेळी तेथे कॉंग्रेसच्या दुसऱ्या नगरसेविका कमरजहां सिध्दीकीही उपस्थित होत्या. या प्रश्‍नामुळे तेथे उपस्थित असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निसार अली यांना धक्काबुक्की करत मारहाणही केली. निसार अली यांनी या प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात ऑनलाईन तक्रार केली आहे. 
पत्रकारावरील हल्ल्याचा राजकीय नेत्यांकडून निषेध

सकाळच्या बातमीदारावर झालेल्या हल्ल्याचा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी आदींनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 
"सरकारमधील सहभागी पक्षाच्या लोकांना आपण काय करतो याबाबत भान असायलाच हवे. जे घटक नियम करतात त्यांनीच ते सर्वप्रथम पाळायचे असतात, असे मी नेहमीच सांगतो. राज सरकारमधे सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाची नगरसेविका असे करणार असेल तर लोकांसमोर आपण काय आदर्श ठेवणार याचा विचार त्यांनी करावा. सकाळ च्या पत्रकाराला झालेली मारहाण चुकीची आहे, मी त्याचा निषेध करतो. जो वस्तुस्थिती सांगत नियमांची आठवण करून देतो त्या पत्रकारावर अशा प्रकारे हल्ला होणे हे योग्य नाही", अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी निषेध केला आहे. 
सध्याच्या दिवसांत मोठे सार्वजनिक कार्यक्रम शक्यतो घेऊ नयेत, घेतलेच तर काटेकोरपणे नियम पाळून कमीत कमी उपस्थितीत घ्यावेत. अगदी कार्यक्रम करण्याची खूपच गरज असेल तर दहा पंधरा लोकांच्याच उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून, सुरक्षाविषयक कोविडचे नियम पाळून तो करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे पत्रकार हे लौकशाहीचा चौथा स्तंभ असतात, त्यांना मारहाण करणे याचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. हे योग्य नाही, असा प्रकार कोणाकडूनही होऊ नये, आणि नियम पाळलेच पाहिजेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT