मुंबई

Mumbai: मुंबईतील उड्डाणपुलाचे दोन वेळा होणार उद्घाटन,पालिका प्रशासनाची गोची

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: मालाड पश्चिम येथील मीठ चौकी येथे पालिकेद्वारा बांधलेल्या पुलाचे उद्‍घाटन दोन वेळी करण्यात येणार आहे. मीठ चौकी मार्वे रोड आणि लिंक रोड जंक्शनवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुलाची निर्मिती करण्यात आली.

हा पूल तयार असून येथे साफसफाई व शेवटचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या वेळचे मुंबईचे पालकमंत्री, तसेच मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार यांनी पुलाच्या बांधकामाचे उद्‍घाटन केले होते, मात्र आता पुन्हा उद्‍घाटन होणार असल्याने पालिका प्रशासनाची मात्र गोची होत आहे.

त्यापूर्वी मालवणीहून मालाड व लिंक रोडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी मीठ चौकी येथे पुलाची गरज असून ते लवकरात लवकर बांधण्यात यावे, अशी मागणीदेखील केली होती, तसेच त्यावेळचे भाजप उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित विभागाला पत्र दिले होते.

त्यामुळे आता भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते पुलाचे उद्‍घाटन होणार असल्याच सांगण्यात येत आहे. हे उद्‍घाटन ६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे, तसेच स्थानिक आमदार आणि माजी पालकमंत्री मुंबई असलम शेख हेही १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या समर्थकांसह पुलाचे उद्‍घाटन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. खासदार-आमदारांच्या श्रेयवादामुळे मात्र पालिका व इतर प्रशासनाची गोची होत आहे.

हा पूल सुरू झाल्यानंतर मालाड, तसेच लिंक रोड होत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मीठ चौकी सिग्नलवर थांबावे लागणार नसल्याने वेळ वाचणार आहे.

पुलाचे उद्‍घाटन कोणीही करो, आम्हाला आनंदच आहे. कारण, वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

वाहनचालक - ओंकार महाडिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt Job : कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी! ऑइल इंडियामध्ये इतक्या पदावर होतेय भरती

दिसाया जरी साधा... सुरजच्या विजयावर उत्कर्ष शिंदेने बनवलं जबराट गाणं; म्हणाला, 'ज्यांना जळत असेल त्यांनी'

कोल्हापुरात हॉकी स्टेडियमजवळ सापडला दुर्मीळ मांडूळ साप; अंधश्रद्धेमुळे या सापाची कोटीत आहे किंमत

Garba Night Makeup: गरबा खेळताना घामाने मेकअप खराब होतोय? मग या टिप्सची घ्या मदत

Latest Maharashtra News Updates : महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणी वामन म्हात्रे यांना दिलासा

SCROLL FOR NEXT