Crime sakal
मुंबई

Dombivali Crime : मालेगावहून आलेल्या तरूणींच्या कारची तोडफोड; काचा फोडून 3 लाख 68 हजारांचा ऐवज लंपास

नाशिक जिल्ह्यातील मालेगावहून काही कामानिमित्त कल्याणात आलेल्या नोकरदार तरूणींना कल्याण मध्ये चोरट्यानी लुटले असल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - नाशिक जिल्ह्यातील मालेगावहून काही कामानिमित्त कल्याणात आलेल्या नोकरदार तरूणींना कल्याण मध्ये चोरट्यानी लुटले असल्याची घटना घडली आहे. हॉटेलात नास्ता करण्यासाठी गेलेल्या दोघा बहिणींची कार फोडून चोरट्यांनी त्यातील 3 लाख 68 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात मालेगाव येथे राहणारी चैताली मोरे (वय 29) या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ही तरूणी तिची बहिण लिलानी हिच्यासह काही कामानिमित्त कल्याण पश्चिमेत आली होती. शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास गुरुदेव हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जायचे असल्याने जवळच कार पार्क करून त्या हॉटेलमध्ये गेल्या. साधारण अर्धा तासात त्या बाहेर आल्या असता त्यांना कारची अवस्था पाहून धक्का बसला.

कारच्या डाव्या बाजूस असलेली काच फुटलेली होती. कारमधील 4 बॅग गायब झाला होत्या. त्यामध्ये लॅपटॉप, आयपॅड, ज्वेलरी सेट, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कंपनीचे ओळखपत्र, बहिण लिलानी हिच्या बॅगेत महागडा लॅपटॉप, कॉस्मेटिक सामान, कपडे गॉगल, चष्मा, आदी 3 लाख 68 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT