Malng Gad River sakal
मुंबई

Malng Gad River : निसर्ग खुणावतोय पण सावधान; मलंगगड परिसराने मागील वर्षी घेतलेत 11 बळी

मागीलवर्षी मलंगगड परिसरात पावसाळ्यात तब्बल 11 मुलांचा पाण्याच बुडून मृत्यू झाला होता. या पट्ट्यातील पावसाचा जोर आणि नदी पात्राची खोली माहित नसल्याने या दुर्घटना घडल्या आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसराने पावसाळ्यात हिरवा गालिचा परिधान केला असून मलंगगडाचे हे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करु लागले आहे. नैसर्गिक ओढे - नाले, धबधबे यामध्ये चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची पावले मलंगगडाकडे वळू लागली आहेत.

पर्यटकांना निसर्ग खुणावतोय खरा परंतू सावधगिरीने आनंद लुटणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नदीपात्रातील पाणी पातळीत देखील वाढ झाल्याने तरुणांची हुल्लडबाजी याठिकाणी वाढू लागली आहे. मागील आठवड्यातच पाच तरुण खरड येथील नदीपात्रात अडकल्याची घटना घडली होती.

मागीलवर्षी मलंगगड परिसरात पावसाळ्यात तब्बल 11 मुलांचा पाण्याच बुडून मृत्यू झाला होता. या पट्ट्यातील पावसाचा जोर आणि नदी पात्राची खोली माहित नसल्याने या दुर्घटना घडल्या आहेत. यंदा अशा दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन काय खबरदारी घेते हे पहावे लागेल.

ठाणे जिल्ह्यातील मलंगगड परिसर हा हिरवाईने नटलेला आहे. पावसाळ्यात तर या परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. शहरापासून जवळचे ठिकाण असल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात.

एक दिवसाची पिकनिक होत असल्याने या भागात महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले देखील दरवर्षी गर्दी करतात. मलंगगड परिसरात ओल्या पार्ट्यांना उधाण येत असून तरुणाईची हुल्लडबाजी त्यांच्या जीवावर बेतत आहे. शनिवार - रविवार पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी येथे होऊ लागली आहे. निसर्गाचा आनंद लुटण्याची मज्जा अनेक पर्यटकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे.

नदी पात्रात बुडून मृत्यु पावणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जिल्हा प्रशासन, पोलिस या भागात पर्यटकांना अटकाव करतात. परंतू त्यांचे मनाई आदेश धुडकावून पर्यटक या भागात जातात. मागील आठवड्यात शुक्रवारी खरड येथील बंधारा पार करून तरुण ढोके गावाच्या दिशेने मोकळ्या मैदानावर निसर्गाचा आनंद घेत होते.

सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पात्रात सायंकाळी अचानक वाढ झाली आणि हे तरुण बंधाऱ्यावर अडकले. त्यांनी मदतीसाठी हाक दिली परंतु आजूबाजूला कोणीच नसल्याने त्यांच्या मदतीसाठी कोणी आले नाही. अखेर त्यांनी मानवी साखळी तयार करत पाण्यातून सुखरुप बाहेर पडले. स्थानिक नागरिक पर्यटकांना सातत्याने आव्हान करत असतात नदी पात्र, ओढे नाले हे धोकादायक आहेत, खोल आहेत.

तरी सुद्धा त्यांचे म्हणने न ऐकता पर्यटक पाण्यात उतरतात. मागील वर्षी 11 जणांचा पाण्यात बुडून या भागात मृत्यु झाल्याची घटना घडली होती. यंदा अशा घटना होऊ नये यासाठी पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच परिसरात होणाऱ्या ओल्या पार्ट्या आणि हुल्लडबाजांना प्रशासन कधी आवर घालते हे देखील पहावे लागेल.

मात्र डोंगर माथ्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पाच तरुण अडकून बसले होते. त्या परिसरात त्यांना वाचवण्यासाठी देखील कोणी उपस्थित नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT