मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी रागानं बैठक अर्धवट सोडून पुन्हा पश्चिम बंगालकडे रवाना झाल्याची चर्चा आहे. एनडीएच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात याचा उल्लेख केला, त्यामुळं तो चर्चेचा विषय झाला. (Sharad Pawar tried to stop but Mamta Didi didnt stop Devendra Fadnavis told what happened in INDIA meeting)
फडणवीस म्हणाले, "विरोधक जेव्हा एखाद्याचं मन वळवू शकत नाहीत तेव्हा ते कन्फ्युज करण्याचं काम करत आहेत. आमचे सर्व मित्रपक्ष फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही. इथं कुणालाच प्रश्न पडला नाही की आमची जाग नेमकी कुठे आहे?
पण विरोधकांच्या बैठकीत ममता दीदी आल्या आहेत, त्यांना बसायला खुर्ची दिली नाही. त्यामुळं त्या रागानं निघून गेल्या. त्यांना शरद पवारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या नाहीत. पवारांनी अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला ते पण थांबले नाही"
आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी आहेत. तुमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण आहेत? रोज नवीन नवां समोर येत आहेत. पण ज्यांनी बैठकीचं आयोजन केलं त्यांचं नाव येतच नाही. इंडिया आघाडीची भेंडी आघाडी झाली आहे. (Latest Marathi News)
लोगो तयार करणार होते पण लोगो सुद्धा आला नाही. रंग कोणता? 36 पक्ष कोणते? प्रत्येकाचे रंग वेगळे, त्यांचं आपण स्वागत केलं. त्यांना आपण परत पाठवू, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. आपला अजेंडा विकासाचा आहे. महाराष्ट्राला आणि देशाला उच्च शिखरावर कसं नेता येईल हा अजेंडा घेऊन आपण एकत्र आलो आहोत. मोदी रोज नव्या योजनेमधून गरीबांच कल्याण करतात. (Marathi Tajya Batmya)
अर्थव्यवस्था वाढल्यानं नोकऱ्या वाढल्या आहेत. काही लोक बुद्धीभेद करतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबई सध्या 6 टक्के आर्थिक योगदान देते, यात 20 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. पुढील चार महिन्यात विकास आराखडा आणू, अशी घोषणाही यावेळी फडणवीसांनी केली.
काही लोक म्हणतात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची योजना झाली, असं उद्धव ठाकरे नेहमी बोलतात पण मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. मुंबई कुणी तोडू शकत नाही, असं करण्याची कुणाच्या बापाचा बापाच्या बापाची ताकद नाही. यांनी कधीच विकास होऊ दिला नाही.
कायम मराठी माणसात भय ठेवलं. मुंबईच्या विकासाला जो विरोध करतो तो महाराष्ट्रद्रोही आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली मुंबईचा आता खरा विकास होतोय. मुंबईतून मराठी माणूस बाहेर गेला पण आता कोणी बाहेर जाणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.