मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडी सी लिंकवर पार्क करून एकाने समुद्रात उडी मारल्याने खळबळ उडाली. दरम्यान आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाहीये.
दरम्यान सी लिंकवरून उडी मारणारा इसम खारचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.दीपक खूपचंदानी असे या व्यक्तीचे नाव आहे. दिपक हा कल्पक सीएचएसएल, खार रोड नं १५, खार पश्चिमचा राहणारा आहे.
वरळी पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच समुद्रात उडी मारलेल्या या व्यक्तीचा नौसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध घेण्याचे काम सुरू आहे. या सी लिंकवरून बऱ्याचदा आत्महत्येचे प्रयत्न केले जातात. आज पुन्हा असचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिपकच्या कुटुंबियांशी संवाद साधला असून पोलिस दिपकचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.