नवी मुंबई : एचआयव्हीग्रस्त तरुणाने आपल्याला एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती लपवून ठेवून कामोठे भागात राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीसोबत विवाह केल्याने वर्षभरातच सदर तरुणीला देखील एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कामोठे पोलिसांनी पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून एचआयव्हीग्रस्त तरुणासह त्याच्या नातेवाईकांवर फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
#JNUAttack : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
या घटनेतील एचआयव्हीग्रस्त तरुण डोंबिवली पुर्व भागातील कल्याण-शिळफाटा येथे रहाण्यास असुन तो मुंबई महापालिकेत कामाला आहे. तर या घटनेतील पिडीत तरुणी कामोठे भागात रहाण्यास आहे. 2016 मध्ये पिडीत तरुणीचे आई-वडील लग्नासाठी मुलाच्या शोधात असताना त्यांच्या ओळखीतल्या लोकांनी आरोपी तरुणाची माहिती दिली होती. सदर तरुण मुंबई महापालिकेत कामाला असल्याने त्याची जास्त विचारपूस न करता पिडीत तरुणीच्या आई-वडीलांनी त्याचे स्थळ पक्के करुन बोलणी केली होती. त्यावेळी सदर तरुणाने व त्याच्या नातेवाईकांनी देखील त्याला एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती पिडीत तरुणी व तीच्या आई-वडीलांना न देता तीच्या सोबत विवाह केला.
मोठी बातमी : दारुची बाटली, चिकन नको; काम करा, मगच मत मागा
दरम्यान, विवाहानंतर एचआयव्हीग्रस्त तरुणाचे नातेवाईक नेहमी घरी येऊन त्यांच्या मुलाची विचारपुस करुन त्याने गोळ्या खाल्या का? याबाबतची आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. त्यामुळे आपल्या पतीला कुठला आजार झाला आहे, याची विचारणा अनेकदा करुनसुध्दा पिडीत तरुणीला कुठल्याही प्रकारची माहिती सासरच्यांकडून दिली जात नव्हती. त्यानंतर पिडीत तरुणीचा पती अधुनमधून आजारी पडू लागल्याने त्या तरुणीची शंका आणखी बळावली गेली. त्यावेळेस सासरच्या मंडळींनी आपल्या मुलाला टीबी झाल्याचे सांगून पिडीत तरुणीची बोळवण केली होती.
मात्र काही दिवसानंतर पतीची तब्येत जास्तच खराब झाल्याने त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर पिडीत तरुणीला आपल्या पतीला एचआयव्हीची लागण झाल्याचे समजल्याने तिला धक्काच बसला. आपली फसवणूक केल्याचा आरोप तिने सासरच्यांवर करताच तिला मारहाण करुन घरातुन हाकलून लावण्याचा प्रयत्न देखील सासरच्या मंडळींनी केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. दरम्यान, काही दिवसानंतर पिडीत तरुणी देखील आजारी पडल्याने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तीच्या रक्ताच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. मात्र या तपासणीत तीला काय झाले आहे? याची माहिती सासरच्या मंडळींनी तीच्यापासून लपवून ठेवून तीला फक्त ताप आणि अशक्तपणा असल्याचे सांगितले होते.
धक्कादायक : मुंबई उपनगराचे झाले गॅस चेंबर!
रुग्णालयातून घरी परतल्यानंतर सदर बाब पिडीत तरुणीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांनी पिडीत तरुणीचे एमजीएम रुग्णालयात तसेच वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात रक्ताची तपासणी केली असता, तीला सुद्धा एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लग्नानंतर एचआयव्हीग्रस्त पतीसोबत ठेवलेल्या शरीरसंबधामुळे तीला देखील एचआयव्हीची लागण झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक केल्याचा जाब विचारण्यासाठी पिडीत तरुणी व तिचे नातेवाईक सासरच्या मंडळींकडे गेले असता पिडीत तरुणीच्या सासरकडील मंडळींनी व तीच्या पतीने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच पिडित तरुणीच्या घरच्यांनी दिलेले दागिने व इतर वस्तू परत करण्यास देखील नकार दिल्याचा आरोप पिडिताने आपल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकारानंतर पिडीत तरुणीच्या आई-वडीलांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालायने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार या प्रकरणात एचआयव्हीग्रस्त तरुण व त्याच्या नातेवाईकांवर फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
man with hiv aids married to without informing about his illness case registered
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.