Man vandalized 12 auto rickshaws at Diva station Marathi Crime News rak94 
मुंबई

Diva Station News : दिवा स्टेशनजवळ माथेफिरू तरुणाचा राडा! सळईने 12 रिक्षा फोडल्या

Diva Station Crime News : दिवा स्टेशनजवळ सकाळी सहाच्या सुमारास एका माथेफिरू तरुणाने हातातील लोखंडी सळईने 12 रिक्षांची तोडफोड केली.

आरती मुळीक-परब

दिवा : दिवा स्टेशनजवळ सकाळी सहाच्या सुमारास एका माथेफिरू तरुणाने हातातील लोखंडी सळईने 12 रिक्षांची तोडफोड केली. तर तोडफोड थांबवण्यास येणाऱ्या रिक्षा चालकांना देखील लाथा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळी कामाला जाण्याची घाई असते. त्यात कुठून तरी एक माथेफिरू तरुण दिवा पूर्वेतील सरकत्या जिन्याकडील रिक्षा स्टँड जवळ येऊन हातातील लोखंडी सळईने तेथे उभ्या असणाऱ्या रिक्षांच्या काचा फोडू लागला. ही तोडफोड थांबवण्यास येणाऱ्या रिक्षा चालकांना त्याने लाथा घातल्या. प्रसंगी त्याला रिक्षा चालकांनी, नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने चॉपर काढून सगळ्यांना धमकावत तो पळून गेला. यांनतर सर्व रिक्षा चालकांनी शिवशक्ती रिक्षा युनियन सोबत जाऊन दिवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. यावेळी कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही.

महेश मुंडे या रिक्षा चालकांने सांगितले की, हा माथेफिरू तरुण मुंब्रा देवी कॉलनीतून येऊन तयार होणाऱ्या पुलाच्या खाली असणाऱ्या लोखंडी सळयांमधील एक सळई घेऊन दिवा स्टेशनजवळ सरकत्या जिन्याच्या जवळ आला. तेव्हा माझी रिक्षा लावून मी प्रवाशांची वाट बघत होता. तो तसाच रागात येऊन त्याने माझी व बाकीच्यांही रिक्षा तोडल्या. त्याने चॉपर काढल्याने पकडता आले नाही. तर त्याच्या विरोधात आम्ही सर्व रिक्षा चालकांनी पोलीसात तक्रार दिली आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT