मुंबई

दहशतवादी कसाबला फासापर्यंत पोचवणाऱ्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दहशतवादी कसाबला फासावर चढविणासाठी ज्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली असे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचा मंगळवारी कल्याण येथील राहत्या घरी मृत्यू झाला.  सीएसटी येथील कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्या झेलणा-या श्रीवर्धनकर यांनी कसाबला न्यायालयात ओळखले होते. लॉकडाऊनच्या कालावधीत  श्रीवर्धनकर मुंबईतील चिंचपोकळी येथे फूटपाथवर सापडले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या कल्याण येथील कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले होते.

पदपथावर राहण्याची वेळ : 

कुटुंबीयांनी घराबाहेर काढल्यामुळे श्रीवर्धनकर यांच्यावर पदपथावर राहण्याची वेळ आली होती. चिंचपोकळी परिसरातील डीन डिसुजा दुकानदाराने त्यांना आश्रय दिला. त्यानंतर त्यांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हरिश्चंद्र यांना मदत केली आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांशी भेट घडवून दिली.

आजारी श्रीवर्धनकरांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान श्रीवर्धनकर यांना एक गोळी देखील लागलेली होती. पुढे याप्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू झाली त्यावेळी श्रीवर्धनकर यांनी कसाबविरोधात दिलेलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली होती. ते या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. 

कसाबला फासावर लटवणाऱ्या मुख्य साक्षीदारांपैकी ते एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती. त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलने घातलेल्या दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते. याची सर्विस्तर माहिती त्यांनी दिली होती. 

दोन गोळ्या लागूनही केला होता प्रतिकार

मुंबईतील 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल याने हरिश्चंद्र यांच्या पाठीत दोन गोळ्या झाडल्या होत्या. मात्र हार न मानता हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांनी बॅगच्या सहायाने इस्माईलला मारत प्रतिकार केला. कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार म्हणून हरिश्चंद्र हे कायम सर्वांच्या स्मृतीत राहतील. विशेष न्यायालयासमोर कसाबला त्यांनी ओळखत त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती.

6 मेला मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील दुकानाचे दुकानदार डिन डिसूजा यांना श्रीवर्धनकर रस्त्यावर बसल्याचे आढळून आले होते. माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना आसरा दिला. अन्न - पाण्याशिवाय श्रीवर्धनकर हे वृद्ध आजोबा रस्त्यावर राहत होते. त्यानंतर पोलिस व सामाजिक संस्थेच्या मदतीने दुकानदाराने श्रीवर्धनकरांच्या कुटुंबियांची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी कल्याण येथील खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.

man who played important role is kasab court case passed away due to old age 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT