management railways passengers suffer second day 52 mail-express trains affected due to freight train accident esakal
मुंबई

Mumbai News : रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल; मालगाडीच्या अपघातामुळे ५२ मेल- एक्सप्रेस गाड्या फटका

२५ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द; दहा ते बारा तास प्रवासी अडकून पडकले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पनवेल ते कळंबोली विभागात शनिवारी एका मालगाडीचे पाच डब्बे रेल्वे रुळांवरुन घसरल्याचा फटका सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्याना बसला आहे. आतापर्यत ५४ मेल-एक्सप्रेस गाडयांना फटका बसला आहे. तर आतापर्यत २५ मेल- एक्सप्रेसपेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे.

तर अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या तासोंतास एकामागे एक खोळंबल्या आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यातील पाणी संपले तसेच पंखे बंद असल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल आहे. विशेष म्हणजे कोणत्या गाड्या रद्द केल्या,कोणत्या गाड्यांचे मार्ग वळविले,याची माहिती प्रवाशांना तात्काळ मिळाली नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती.

शनिवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास पनवेल-दिवा मार्गावरुन वसईच्या दिशेने अप मार्गावर एक मालगाडी जात होती.एकुण ५९ वॅगन या मालगाडीला होते. मालगाडी कळंबोली परिसरात आली असता मालगाडीचे चार वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे पाच डबे रुळावरून खाली घसरले.यामुळे पनवेल ते कळंबोली विभागातील रेल्वे वाहतुक ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या अभियांत्रिकी पथकांने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे डबे बाजूला करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले. परंतु हे काम रविवार रात्री उशिरापर्यत सुरु होते.त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. कोणत्या गाड्या रद्द केल्या,कोणत्या गाड्यांचे मार्ग वळविले,याची माहिती प्रवाशांना तात्काळ त्यांच्या तिकिटावर रजिस्टर मोबाईल क्रमांकावर देणे अपेक्षित होते.

परंतु मध्य रेल्वेने मात्र या बाबत कोणतीही गंभीरता दाखविली नाही. प्रवाशांना कोणतीही माहिती नसल्याने प्रवासी पनवेल,एलटीटी स्थानकात गाडी पकडण्यासाठी आले. परंतु गाडया अनिश्चित काळ उशिराने धावत असल्याचे स्थानकात आल्यानंतर समजल्याने प्रवाशांना प्लटफार्मवरच रात्र काढावी लागली. त्यामुळे महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

  • एकूण किती गाडयांना फटका - ५४

  • रद्द गाड्यांची संख्या - २६

  • वळविण्यात आलेल्या गाड्या - १२

  • वेळेत बदल केलेल्या गाड्या - ६

  • शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या - ४

  • शॉर्ट ओरीजिन गाड्या - ६

५४ मेल- एक्सप्रेस गाडयांना फटका -

मालगाडी घसरल्याने शनिवार-रविवार या दोन दिवसात तब्बल ५४ मेल-एक्सप्रेसला फटका बसला. यापैकी २६ गाड्या रद्द करण्यात आल्या. १२ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. सहा गाड्यांच्या वेळा बदलल्या. चार गाड्या मधल्या स्थानकांपर्यतच चालविण्यात आल्या.याशिवाय अप आणि डाउन मार्गावरील १५-१५ गाड्यांना लेटमार्क लागला.

या २६ ट्रेन रद्द -

रविवारी सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०१३४८ रोहा दिवा मेमू, ट्रेन क्रमांक ०१३४९ दिवा रोहा मेमू, ट्रेन क्रमांक ०११५५ दिवा चिपळूण एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक ११००३ दादर सावंतवाडी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ०११६६ मंगळुरु एलटीटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ०७१०५ पनवेल खेड एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ०७१०६ खेड पनवेल विस्तार एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १०११२ मडगाव सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११००४ सावंतवाडी दादर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ०११७२ सावंतवाडी सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१३३ सीएसएमटी- मंगळुरु एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर सोमवारी सुटणाऱ्या ट्रेन १०१०३ सीएसएमटी -मडगाव एक्स्प्रेस आणि १११००मडगाव- एलटीटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत.

वेळेत बदल

ट्रेन क्रमांक ०११५४ रत्नागिरी-दिवा एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक ०९०१९ मडगाव-उधना एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक ०११४० मडगाव-नागपुर एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे.

१० ते १२ तास प्रवासी अडकून -

मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या एकामागेएक खोळंबल्या होत्या. साधारणता १५ ते १६ मेल- एक्सप्रेस गाडयांना खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहे. विशेष म्हणजे अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या १० ते १२ तास विलंबाने धावत असल्याने रेल्वे डब्यातील पाणी संपले होते, खाद्यपदार्थाची सोय नाही तर काही गाड्यांची वातानुकूलित यंत्रणा बंद होती. त्यामुळे कोकणातून मुंबई येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

दिव्या स्थानकांवर आंदोलन -

मालगाडीच्या अपघाताची झड रविवारी सकाळी उपनगरीय लोकला बसली आहे. दिवा-सावंतवाडी ही सकाळी ६. ४५ वाजता सुटणारी रेल्वे न आल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. वंदे भारत आणि जनशताब्दी या गाड्या देखील कल्याण कर्जत मार्गे वळवण्यात आल्या.

या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या प्रवाशांनी दिवा स्थानकावरील तिन्ही मार्गावर उतरुन रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ जवानांनी रेल्वे रुळावर असलेल्या आंदोलकांना दूर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT