डोंबिवली : कल्याण ग्रामीण विभागात मांडा टिटवाळा (Mandai-Titwala) येथे 59 हजार 855 युनिट वीज चोरल्या प्रकरणी (Unit Electric robbery) 31 जणांविरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात (Murbad police) गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे. मीटरमध्ये फेरफार, परस्पर केबल जोडून ग्राहकांनी 8 लाख 4 हजार 480 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड महावितरणच्या तपासणी पथकास (MSEB Authorities) आढळुन आले आहे.
ग्रामीण भागात अनेकदा ग्राहक आकडा टाकून, मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरत असतात. सध्या महावितरण कंपनी तोट्यात असून हा तोटा भरून काढण्यासाठी महावितरणकडून वीज बिल थकविणारे ग्राहक, वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई केली जात आहे.
ग्रामीण भागातील मांडा टिटवाळा परिसरात 31 ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार, मीटर बायपास आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर केबल जोडून वीजचोरी केल्याचे विशेष पथकाच्या तपासणीमध्ये आढळून आले होते. त्यानुसार सहाय्यक अभियंता निलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.