Manohar Joshi  Esakal
मुंबई

Manohar Joshi : आडनाव जोशीच असू द्या फक्त नाव बदला! पवारांचा बाळासाहेबांना फोन अन् सेनेचा पहिला मुख्यमंत्री बदलला!

Manohar Joshi Passed Away: शरद पवारांचा बाळासाहेबांना फोन गेला अन् शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री बदलला!

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे 3 वाजता निधन झालं. 86 वर्षीय मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय तसेच महाराष्ट्राचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री अशी मनोहर जोशी यांची ओळख होती.(balasaheb Thackeray made Manohar Joshi chief minister in 1995 after Sharad Pawar advice)

बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना शिवसेना-भाजपा युतीच्या राज्यातील पहिल्या विजयानंतर 1995 साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. मात्र बाळासाहेबांनी हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सल्लाने घेतल्याचा दावा ‘आधारवड’ या पुस्तकात करण्यात आला आहे.

भाजप पेक्षा ८ जागा जास्त निवडून आणणाऱ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असतील असं ठरलं होतं. आता प्रश्न होता तो, शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार याचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर आधीच जाहीर केलं होतं, "मी मुख्यमंत्री होणार नाही. पण, मला उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं कि बसणारा मुख्यमंत्री हवा आहे. पदावर कोणीही बसो सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात राहील."

बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होणार नाहीत म्हटल्यावर मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नावं चर्चेत आली. हे दोघं मामा भाचे. शिवसेनेच्या स्थापनेच्या काळापासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होते. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी एकेकाळी आपल्या मोटारी भाड्याने देत होते. त्यातूनच त्यांची आणि बाळासाहेबांची ओळख झाली होती. मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांसाठी ड्रायव्हरचं काम केलेलं होतं. ठाकरे माझा ड्रायव्हर एलएलबी आहे असं देखील गंमतीने म्हणत.

मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील होऊन सुरू झाली आणि नंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले. १९८० च्या दशकात मनहर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले. मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते.

मनोहर जोशी यांनी १९७० च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते १९७६ ते १९७७ या काळात मुंबईचे महापौरही होते.

मनोहर जोशी यांनी १९९५-१९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना २००२-०४ साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले. मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे काम केले.

मनोहर जोशी यांची मुख्यमंत्री पदी निवड

१९९५ सालच्या निवडणूकाचे निकाल लागले तेव्हा अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने वळवायचं काम मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा मनोहर जोशी यांचं नाव पुढं आलं. परंतु शिवसैनिकांची इच्छा होती, मुख्यमंत्री सुधीर जोशी यांना करावं. वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर लोकांची गर्दी जमली. कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रीपदासाठी नावाची घोषणा होणार होती. सुधीर जोशी यांचं नावं जाहीर होईल अशी सर्वांची इच्छा होती.

बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सुधीर जोशी यांचं नाव जवळपास निश्चित केलं होतं. पण, रात्री अचानक त्यांना शरद पवारांचा फोन आला. त्यांनी सहज मुख्यमंत्रीपदाची चौकशी केली. जेव्हा बाळासाहेबांनी भावी मुख्यमंत्री म्हणून सुधीर जोशींचं नाव सांगितलं तेव्हा ते म्हणाले, "आडनाव जोशींचं राहू द्या, पण नाव बदला."

बाळासाहेब ठाकरेंचा पवारांवर मोठा विश्वास होता. अपक्षांच्या एकत्रितपणामुळे स्थापन झालेलं युतीचं सरकार सुधीर जोशी चालवू शकतील का हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना पडला. त्यांच्या ऐवजी मनोहर जोशी यांचे नाव शिवसेना प्रमुखांनी जाहीर केले. या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला मात्र, या सगळ्या निर्णयामागे शरद पवार आहेत हे नंतर समोर आलं.

कुठे आहे हा उल्लेख?

शरद पवारांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राजकीय कारकीर्द सांगणारे हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या पुस्ततकामध्ये मनोहर जोशी पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री शदर पवार यांच्या सल्ल्याने झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेना-भाजपाची 1995 साली पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर सुधीर जोशी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झालं होतं. पण, मनोहर जोशींनी मुख्यमंत्री करावं, असा सल्ला शरद पवार यांनी बाळासाहेबांना दिला. त्यानंतरच मनोहरपंत मुख्यमंत्री झाले, असा उल्लेख ‘आधारवड’मध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT