manoj jarange maratha reservation protest left azad maidan mumbai Sakal
मुंबई

Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी आझाद मैदान सोडले

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने मोठ्या संख्येने मराठा आंदोलन आझाद मैदानात ठाण मांडून होते.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News - मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने मोठ्या संख्येने मराठा आंदोलन आझाद मैदानात ठाण मांडून होते. आज मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढल्यानंतर आंदोलन मागे घेतले. यानंतर आझाद मैदानातील आंदोलकांनीही मैदान सोडले.

मनोज जरांगे पाटलांनी मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानावर जाऊल आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला होता.यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानातील परवानगी नाकारली.

मात्र यानंतर ही मराठा आंदोलक आझाद मैदानातील आंदोलनावर ठाम होते. पोलिसांना न जुमानता त्यांनी आझाद मैदानात मंच उभारला. सुमारे एक ते दीड हजार मराठा आंदोलक मैदैनात ठाण मांडून होते. २५ ते ३० वाहन ही मैदानात उभी करण्यात आली होती.

सर्वांचे लक्ष हे जरांगे पाटलांच्या भुमिकेकडे लागून होते. काहीही झाले तरी आझाद मैदानात गुलाल उधळणार असा निर्धार ही मराठा आंदोलकांनी केला होता. मात्र सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य करत तसा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वता वाशीतील सभेमध्ये जाऊन जरांगे पाटलांना दिला. यानंतर जरांगे पाटलांनी आपले आंदोलन स्थगित करत आपल्या कार्यकर्त्यांसह माघारी फिरले.

मनोज जरांगे पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट करताच आझाद मैदानातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लाश करत गुलाल उझळला. जोरदार घोषणाबाजी करत सिएसएमटी परीसर दणाणून सोडला.

यानंतर अनेक आंदोलकांनी व्हिडीओ कॉल करून आझाद मैदानातील जल्लोश आपल्या गावाकडील नातेवाईकांना दाखवला. यानंतर ते आपल्या सोबत आललेल्या वाहनांतून तर काहींनी सिएसएमटी स्थानक गाठत परतीचा प्रवास सुरू केला.

मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली असे वाटत नाही.पण आम्ही आमची ताकत दाखवली आहे. आम्ही सरकारवर दबाव निर्माण करण्यास यशस्वी झालो आहोत. 

- नितेश पाटील,आंदोलक       

सरकारने तत्वता आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत.अधिसुचना काढल्यावर ख-या अर्थाने आरक्षण मिळाले असे म्हणू शकतो. मात्र ते न्यायालयात टिकणारे हवे. ही सरकारची जबाबदारी आहे. अन्यथा आम्ही आझाद मैदानात आल्याशिवाय राहणार आहे.

- सागर पाटील,आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT