Manoj Jarange  Esakal
मुंबई

Maratha Reservation: महाराष्ट्रातील मेगाभरतीला ब्रेक? आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका, जरांगे पाटील यांची मागणी

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी आज शिष्टमंडळाशी चर्चा केली, त्यानंतर ते आता मराठा समाजाशी संवाद साधत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest

“आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरीसाठी भरती प्रक्रिया राबवू नका किंवा मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून भरती प्रक्रिया राबवावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे शुक्रवारी केली. त्यामुळे आता जरांगेंच्या मागणीबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार, भरती प्रक्रियेचं काय होणार याकडे हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी दुपारी नवी मुंबईत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशी येथे आंदोलकांशी संवाद साधला. यात जरांगे पाटील यांनी नोकरभरतीसंदर्भात महत्त्वाची मागणी केली. जरांगेंनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती प्रक्रियाच राबवू नये किंवा राबवायची असल्यास मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून सरकारी भरती करावी अशी ठाम भूमिका मांडली.

त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मेगाभरतीला ब्रेक लागणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारी विभागांमध्ये २०१६ ते २०२२ या कालावधीत पदभरती झाली नव्हती. गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रियेला सुरूवात झाली होती. आता जरांगेंनी पदभरतीसंदर्भात ठाम भूमिका घेतल्याने सरकार तातडीने तोडगा काढणार की चर्चेच्या फेऱ्यांमध्ये भरती प्रक्रियेला ब्रेक लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मनोज जरांगे पाटलांनी दिली आज रात्रीची मुदत

जरांगे पाटील यांनी सरकारला आज रात्रीपर्यंतची मुदत दिली आहे. आज रात्रीपर्यंत त्यांनी सगेसोयरे यांना देखील आरक्षण मिळण्यासाठीचा अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा उद्या आझाद मैदानाकडे कूच करु कशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आरक्षण मिळालं नाही तरी आझाद मैदानात जाणार, तसेच आरक्षण दिलं तरी वियजाचा गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानात जाणार, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT